कोकण

सावंतवाडी मिलाग्रीस प्रशालेत विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत

CD

swt1614.jpg
71013
सावंतवाडी ः मिलाग्रीस हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

सावंतवाडी मिलाग्रीस प्रशालेत
विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ : येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचे स्वागत जल्लोष व उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. सुरुवातीला रंगीत फुग्यांचे दालन तयार करून शालेय इमारतीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून वर्गखोल्यांमध्ये शिक्षकांच्या मदतीने बसविण्यात आले. स्वागत समारंभाच्या सुरुवातीलाच प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत व प्रार्थना गीताने शालेय वातावरणाची निर्मिती करत परिपाठाचे सादरीकरण करण्यात आले. नवीन प्रवेश घेतलेल्या गरीब होतकरू व निवडक विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भंडारामार्फत मोफत गणवेश व वह्यांचे वाटप मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी ‘स्टार’ या शब्दाच्या संकल्पनेतून शाळेतील विविध उपक्रम व स्पर्धांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने या नवीन संकल्पनेच्या फलकाचे अनावरण मुख्याध्यापकांनी केले.
मुख्याध्यापक सालदाना यांनी, नवीन शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्वागत करीत या शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर, मराठी प्रायमरी मुख्याध्यापिका सिस्टर कविता चांदी, इंग्लिश प्रायमरी पर्यवेक्षिका क्लिटा परेरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप वारंग यांनी केले. आभार रोजा फर्नांडिस यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jai Jawan Pathak: अनेक प्रयत्न कोसळले, पण अखेर उभा राहिला १० थरांचा इतिहास, कोकणनगरनंतर जय जवान पथकाची विजयी झेप!

Dahi Handi 2025: ठाकरे बंधुनंतर कार्यकर्त्यांचे मनोमिलनाचे बॅनर, दहीहंडी उत्सवात झळकले एकत्रित फोटो

"मी स्वतःच माझ्या लग्नाची बोलणी केली" गिरीश ओकांच्या लेकीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली..

Latest Maharashtra News Updates : शिर्डीतील साईमंदिरात सोन्याचा त्रिशुळ अर्पण

Kalamb News : मांजरा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध अद्याप अपूर्ण, एनडीआरएफचे प्रयत्न सुरू

SCROLL FOR NEXT