कोकण

ःपरशुराम घाटातील भराव पेढे गावात

CD

-ratchl१६७.jpg-
P२५N७१०६७
चिपळूण ः पेढे येथे घर परिसरात साचलेला चिखल.
-----
परशुराम घाटातील भराव पेढे गावात
वस्तीत चिखल; ठेकेदार कंपनीविरोधात असंतोष
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत परशुराम घाटात खचलेल्या काँक्रिटीकरणाच्या भागात गॅबियन वॉल उभारली जात आहे. या भिंतीसाठी मोठ्या प्रमाणात भराव केला आहे. मुसळधार पावसात हा संपूर्ण भराव पायथ्यालगतच्या पेढे गावात वाहून गेल्याने भरवस्तीत चिखल व दलदल निर्माण झाली आहे. घरांच्या आजूबाजूला चिखल साचल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून परशुराम घाटातील मध्यवर्ती भागात लोखंडी जाळीच्या आधारे गॅबियन वॉल उभारली जात आहे. सुमारे ९० मीटरहून अधिक लांबीची ही भिंत दगडमातीच्या मिश्रणातून उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत या भिंतीचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे; मात्र अजूनही बरेचसे काम बाकी असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात भरावाची माती टाकण्यात आली आहे. आता पावसाच्या पाण्यासोबतच ही माती वाहून डोंगराच्या पायथ्याला असलेल्या वस्तीत ती येऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या या पावसात मोठ्या प्रमाणात चिखल भरवस्तीत वाहून आल्याने दलदल निर्माण झाली आहे. घरांच्या आजूबाजूला चिखल साचल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. याबाबत संबंधित ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करून देखील दखल घेतली नाही. आता पावसामुळे ही परिस्थिती हाताबाहेर गेली असून, त्याचा धोका अधिक वाढला आहे. याबाबत पेढे गावच्या सरपंच आरूषी शिंदे म्हणाल्या, मे महिन्यात झालेल्या पावसातही परशुराम घाटातील माती गावच्या शेतात आली होती. ही माती काढण्याची मागणी केल्यानंतर काही प्रमाणात ती काढण्यात आली; मात्र माती उचलण्याचे सर्व काम पूर्णत्वास गेलेले नाही. त्यातच पुन्हा एकदा भरपावसात घाटातील माती वस्तीत येऊ लागल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही सरपंच शिंदे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: स्वप्नपूर्तीचा आनंद ; वैभव सूर्यवंशी; भारतीय संघात निवड झाल्यानंतर युवा फलंदाज भावुक

Mumbai Rain Red Alert : मुंबईला पावसाचा तडाखा! कांदिवली, मालाडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; हवामान खात्याकडून 'रेड अलर्ट' जारी, पुढील 3 तास महत्त्वाचे

Maharashtra Government Decision : मोठा निर्णय! राज्यातील २९ जिल्ह्यांत नवीन अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालये होणार; सामान्यांचा वेळ, पैसा, त्रास वाचणार

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, अनेक भागांत २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद

Chhatrapati Sambhajinagar: अनेक मंत्र्यांशी संबंध, अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी लावतो; तरुणाला २१ लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT