कोकण

भर पावसात ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत

CD

- ratchl१७३.jpg-
P२५N७१२६३
चिपळूण ः सती चिंचघरी येथे नवोदित विद्यार्थ्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले.

सती विद्यालयात ढोलताशांच्या गजरात स्वागत
चिपळूण, ता. १७ ः सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी-चिंचघरी सती विद्यालयात भरपावसात नवोदित विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
सती मंदिरात राजाभाऊ चाळके, महेश चाळके, डॉ. अरविंद पोतदार, ‘सकाळ’चे साहाय्यक वितरण व्यवस्थापक पांडुरंग साळवी, चिंचघरी सरपंच राजेंद्र चाळके आदींच्या हस्ते रॅलीचे उद्‍घाटन करण्यात आले. विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे फुलांच्या पायघड्या व औक्षण करून गुलाबपुष्प देऊन पुष्पवृष्टी करत मंगलमय वातावरणात साखरपेढे देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक संजय वरेकर यांनी दहावी-बारावी, कला, वाणिज्य, शास्त्र यामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यशाची माहिती दिली.
----
rat१७p१३.jpg-
२५N७१२१४
कारवांचीवाडी ः येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करताना रत्नागिरी ग्रामीण पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्यासह शिक्षक.
कारवांचीवाडीतील शाळेस पोलिस निरीक्षक यादवांची भेट
रत्नागिरी, ता. १७ ः शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाच्या १०० शाळांना भेटी देणे, या उपक्रमांतर्गत रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी कारवांचीवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ ला भेट देऊन पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे स्वागत केले.
शाळेतील विद्यार्थ्यांना पोलिस निरीक्षक यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके, गणवेश, शूज वितरित करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात मुलांची मिरवणूक काढण्यात आली. मुलांच्या पायाचे ठसे कागदावर उमटवून पालकांच्या हाती सुपूर्द करण्यात आले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक जाधव यांनी केले.
--
खेडशी गयाळवाडी शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
रत्नागिरी, ता. १७ : खेडशी-गयाळवाडी येथील स्वामी स्वरूपानंद वसाहतीतील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिलीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल जतन करण्याच्या उद्देशाने त्यांच्या पावलाचे ठसे कागदावर उमटवण्यात आले.
विद्यार्थ्यांचे औक्षण करून फूल, फुगा आणि खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका मीना आखाडे, रश्मी किंजळे, ग्रामपंचायत सदस्य पवार, वंदना गुरव, प्रमोद कोनकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा बांद्रे आदींसह पालक उपस्थित होते.
---
rat१७p५.jpg-
२५N७१२०८
रत्नागिरी : गोदुताई जांभेकर विद्यालयात शाळा प्रवेशोत्सवानिमित्त मुलांवर पुष्पवृष्टी करताना शाळा समिती अध्यक्ष राजन मलुष्टे, प्र. मुख्याध्यापिका संजना तारी.

जांभेकर विद्यालयात मिरवणुकीने विद्यार्थ्यांचे स्वागत
रत्नागिरी, ता. १७ : सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात शाळा प्रवेशोत्सवात वर्गखोल्या आकर्षक रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजवण्यात आल्या होत्या. वर्गांमध्ये फुगे लावून आनंदमय वातावरण निर्माण करण्यात आले.
शाळा समिती अध्यक्ष राजन मलुष्टे, प्र. मुख्याध्यापिका संजना तारी आणि शिक्षक, पालकांनी मुलांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे बोटांचे रंगीबेरंगी ठसे घेऊन वृक्षाच्या छायाचित्रावर आकर्षक फुले-पाने तयार करण्यात आली. स्वागतासाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. सूत्रसंचालन शिवाजी बोटके यांनी केले. आभार अनिल सागवेकर यांनी मानले.
---
rat१७p४.jpg-
२५N७१२०७
रत्नागिरी : बियाणी बालमंदिरात पहिल्या दिवशी विद्यार्थी विविध वेशभूषा करून आले. त्यांच्यासमवेत मुख्याध्यापिका, शिक्षिका.

बियाणी बालमंदिरात विद्यार्थ्यांची आकर्षक वेशभूषा
रत्नागिरी, ता. १७ : येथील भारत शिक्षण मंडळाच्या बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघरात शाळा प्रवेशोत्सव सोहळा झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा केल्या होत्या.
भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, उपाध्यक्ष श्रीराम भावे, खजिनदार सीए नचिकेत जोशी, बालविभागाचे अध्यक्ष दादा कदम व प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर, चंद्रकांत घवाळी, संतोष कुष्टे, मुख्याध्यापिका धनश्री मुसळे, शिक्षक, पालक यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आकर्षक वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
---
‘कोळवणकर’मध्ये ढोलताशांच्या गजरात स्वागत
लांजा, ता. १७ ः लांजा तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्यालय व तुकाराम पुंडलिक शेटये कनिष्ठ महाविद्यालय व का. रा. कोळवणकर ट्रेनिंग स्कूलमध्ये सोमवारी (ता. १६) शाळेच्या पाहिल्याच दिवशी ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करत त्यांचे औक्षण केले गेले. सर्व मुलांना पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आली. या प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष अमोल रेडीज, अस्मिता रेडीज, संस्थेचे सहसचिव सुरेश चव्हाण, पंढरी गुरव, श्रीकृष्ण गुरव, संजीवनी मोसमकर, मुख्याध्यापक अरुण डोळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद बंडगर यांनी केले.
---
rat१६p६७.jpg-
25N71048
रत्नागिरी ः पहिल्याच दिवशी पालिकेच्या दामले विद्यालयात पहिले पाऊल कागदावर उमटवून पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश केला.
----
‘दामले’त विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत
रत्नागिरी, ता. १७ : रत्नागिरी पालिकेची दामले शाळा ही महाराष्ट्रातील एकमेव शाळा आहे की, तिच्या पहिलीच्या वर्गाची पटसंख्या १८६ आहेत. दहावीपर्यंत या शाळेमध्ये १ हजार ४७० विद्यार्थी शिकत आहेत म्हणजे सरासरी एका वर्गामध्ये १४० विद्यार्थी शिकत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. दामले शाळेमध्ये मुलांचे रंगवलेले पहिले पाऊल कागदावर उमटवून पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते त्यांचे शाळेमध्ये स्वागत केले. या वेळी शिक्षणाधिकारी कासार, प्रशासन अधिकारी मुरकुटे, मुख्याधिकारी गारवे, मुख्याध्यापक भगवान मोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, रत्नागिरी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, माजी महिला व बालकल्याण सभापती शिल्पा सुर्वे, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते.
----
- rat१७p२०.jpg-
२५N७१२५९
रत्नागिरी ः जिल्हा परिषद शाळा नाखरे क्र. १ मध्ये मुलांच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमप्रसंगी उपस्थित उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक आदी.
---
नाखरे शाळेत प्रवेशोत्सव साजरा
पावस, ता. १७ ः विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिक्षकांसह पालकांनीही योगदान दिले पाहिजे. मुलांचे बालशिक्षण ते उच्चशिक्षण या प्रवासात पाल्य शाळेत नेमके काय करत आहे, यासाठी त्याची रोज चौकशी करा, असे आवाहन शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरीच्या उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते यांनी केले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नाखरे नं. १ येथील प्रवेशोत्सव कार्यक्रमांमध्ये त्या बोलत होत्या. या वेळी विस्ताराधिकारी भाग्यश्री हिरवे, नाखरे गावच्या सरपंच विद्या जाधव, शुभदा नार्वेकर, प्रकाश गुरव, रामदास लांजेकर उपस्थित होते. पहिली प्रवेशीत विद्यार्थ्यांना सजावट केलेल्या चारचाकीतून मिरवणुकीद्वारे ढोलताशाच्या गजरात आणून ओवाळणीने करण्यात आला.
---
खेड तालुक्यात ९८३ विद्यार्थी दाखल
खेड, ता. १७ : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत मोफत पाठ्यपुस्तक आणि गणवेश वाटप कार्यक्रमाने झाले. खेड तालुक्यात पहिली ते बारावी एकूण ४४१ शाळा असून, यामध्ये जिल्हा परिषदेच्या ३३६, खासगी प्राथमिक व माध्यमिक १०५ शाळांचा समावेश आहे तर उर्दू माध्यमाच्या २० जिल्हा परिषद शाळा प्रत्यक्षात सुरू आहेत. आज खेडमधील विविध जिल्हा परिषदेचे प्रशालेत पहिली इयत्तेत ५०९ मुले तर ४७४ मुली असे एकूण ९८३ विद्यार्थी दाखल झाले आहेत.
---
जांभरूण शाळेत प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात
रत्नागिरी, ता. १७ : तालुक्यातील जांभरूण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत पहिलीचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात झाला. शाळेतील नवोदित विद्यार्थ्यांचे फुगे, फुलं आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरपंच गौतम सावंत, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित सावंत, उपाध्यक्ष प्रवीणा साळुंखे, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक नवागत विद्यार्थ्याच्या पायाला रंग लावून पायाचे ठसे घेण्यात आले. ‘आईच्या नावाने एक झाड’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावले.
--
- rat१७p१५.jpg-
P२५N७१२३८
कसोप-फणसोप येथील लक्ष्मीकेशव विद्यालयात मुलांचे स्वागत करताना मुख्याध्यापिका व मान्यवर.
---
श्री लक्ष्मीकेशव विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत
रत्नागिरी, ता. १७ ः शहराजवळील कसोप-फणसोप येथील जीवन विद्यामंडळ कसोप-फणसोप (मुंबई) संचलित कै. आरती अरविंद साळवी पूर्व प्राथमिक शाळा, कै. सुमनताई विद्याधर परब प्राथमिक विद्यामंदिर व श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षात नर्सरी ते दहावीमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
संस्थाध्यक्ष कमलाकर साळवी, मुख्याध्यापिका राजेशिर्के, प्राथमिक विभागप्रमुख पावसकर, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख साळवी, सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित पालकवर्ग यांच्या हस्ते मुलांवर फुलांचा वर्षाव करत तसेच ढोलताशांच्या गजरात प्रवेशोत्सव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

Ekta Kapoor : इंडियन आर्मीचा अपमान करूनही एकता कपूरवर कारवाई का झाली नाही? पोलिसांनी सांगितलं कारण, म्हणाले त्यांनी पैसे...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT