गोगटे विद्यालयाचे
इंग्रजी परीक्षेत यश
देवगड ः पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शालेय प्रसार परीक्षा विभागांतर्गत घेतलेल्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेत जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिरचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये अपूर्वा अनुप बापट, वेदश्री जयेश गोरे, आर्या दयानंद कदम, हर्षिता गणेश कदम या चार विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणीत गुणवत्ता प्राप्त केली आहे. प्रशालेतून एकूण ३८ विद्यार्थी इंग्रजी विषयाच्या परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या शिक्षिका सौ. प्रज्ञा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था पदाधिकाऱ्यांसह मुख्याध्यापक आणि अन्य शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
--------
बेळगाव-रेडी कनयाळ
बसफेरीअखेर पूर्ववत
रेडी ः कोरोनापासून बंद असलेली कर्नाटक परिवहन महामंडळाची बेळगाव-रेडी कनयाळ ही परतीची बस पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांकडून समाधन व्यक्त केले जात आहे. कर्नाटक परिवहन महामंडळाची बेळगाव- रेडी कनयाळ बस बरीच वर्षे सुरू होती. कोरोना कालावधीत ती बंद केल्याने बेळगाव येथे खरेदी व इतर कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांची बरीच गैरसोय झाली होती. आता कर्नाटक परिवहन महामंडळाने प्रवाशांची गैरसोय व होणारी मागणी लक्षात घेऊन, बेळगाव -आंबोली-सावंतवाडीमार्गे रेडी कनयाळ अशी परतीची बस फेरी सुरू केल्याने प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
-------
कुडाळात उद्या
सत्कार सोहळा
कुडाळ ः डॉट कॉम्स असोसिएशन सिंधुदुर्ग संस्थेतर्फे शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धांचे निकाल व गुणवंत स्पर्धकांचा सत्कार सोहळा रविवारी (ता.२२) सकाळी ११ वाजता मराठा हॉल कुडाळ येथे आयोजित केला आहे. या सोहळ्याचे हे दहावे वर्ष असून, आतापर्यंत सुमारे हजारो विद्यार्थ्यांना गौरविले आहे. उद्याच्या सोहळ्यात विविध स्पर्धेतील ७४० गुणवंतांना गौरविण्यात येणार आहे. जवळपास २०० च्या वर शाळांतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन डॉट कॉम्स असोसिएशन सिंधुदुर्गचे प्रमुख संजय बगळे यांनी केले आहे.
--------------
म्हापणला जुलैमध्ये
मॉन्सून महोत्सव
म्हापण ः येथील कुणाल ऊर्फ बंटी सरमळकर पुरस्कृत उत्साही मित्र मंडळातर्फे ४ जुलैला म्हापण येथे मॉन्सून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शरयु मंगल कार्यालय पाट देऊळवाडा,पाट हायस्कूलसमोर सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध बुवा गुंडू सावंत विरूद्ध संदिप पुजारे यांचा जंगी डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.