सकाळ विशेष - लोगो
rat२२p७.jpg
७२२५८
सीसीटिव्ही कक्ष
rat२२p८.jpg
७२२५९
कक्षाची पाहणी करताना जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे.
-------------------
इंट्रो
घरातील वाद, नाक्यावरील भांडणं, अपघातातील जखमींना मदत, एखादी आत्महत्या असो वा पाण्यात बुडणारी व्यक्ती, आपत्कालीन घटना, मोठ्या आवाजातील डीजे साऊंड, आग किंवा चोरीची घटना काहीही घडो, मात्र पहिली मदत पोलिसांची मिळते, असा विश्वास आता पोलिस दलाने निर्माण केला आहे. तो विश्वास सार्थ ठरवत अवघ्या १० मिनिटात घटनास्थळावर पोहोचून गतिमान प्रतिसाद दिला आहे. तो डायल ११२ या यंत्रणेने. या प्रणालीचा अतिशय प्रभावी वापर करण्यात रत्नागिरी पोलिस दलाने उच्चतम कामगिरीत सातत्य ठेवले आहे. राज्यात ४३ व्या क्रमांकावरून थेट २७ व्या क्रमांकावर दलाने झेप घेतली आहे. एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह अशी भावना आता सर्व सामान्यांमधून उमटत आहे. पूर्वी पोलिस ठाण्यात फोन गेल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांची मानसिकता त्यानंतर बिट अंमलदार आदीचा विचार यामुळे विलंब होत असे. सध्याची प्रणाली पूर्णपणे अद्ययावत व जीपीएस तंत्रज्ञानावर आधारीत आहे. जिथून कॉल आला असेल ते ठिकाणच सिस्टिममध्ये दिसत असल्यामुळे अवघ्या काही मिनिटामध्ये पोलिस घटनास्थळी दाखल होतात.
- राजेश शेळके, रत्नागिरी
------------------
एक फोन विश्वासाचा, डायल ११२
समस्या अनेक उपाय एक ; पोलिसांचा प्रतिसाद ९ मिनिटात
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीची मदत मिळण्यासाठी देशपातळीवर डायल ११२ ही प्रणाली कार्यान्वित केली. राज्यात सुरू झालेल्या डायल ११२ म्हणजे प्रायमरी कॉन्टॅक्ट कंट्रोल (पीसीसी) असे या प्रणालीचे नाव आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये ही प्रणाली सुरू झाली. नवी मुंबईत याचे केंद्र आहे. एखाद्याने मदतीसाठी हा नंबर डायल केला की अवघ्या ३ सेकंदामध्ये त्याला प्रतिसाद मिळतो. जीपीएस यंत्रणेमुळे त्या मोबाईल नंबरचे निश्चित स्थान समजते. त्यावरून जिल्हा पोलिस दलाच्या केंद्रात त्याचा संदेश येतो. डिसपॅचर बसवला असल्याने ज्या पोलिस ठाण्याचे स्थान मिळते, त्या गाडीला हा संदेश जातो. तसेच तक्रार करणाऱ्याचा मोबाईल नंबर देखील जातो. त्या ठिकाणी कर्मचारी गाडी घेऊन लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. या दरम्यान संबंधित नंबरवर कॉल करून त्याला मदतीबाबत विचारणा केली जाते. अवघ्या १० मिनिटाच्या आत ही गाडी घटनास्थळावर पोहोचते आणि अडचणीत असलेल्याला मदत करते. त्याबाबची माहिती तत्काळ नियंत्रण कक्षालाही दिली जाते. जिल्ह्यात अशा ५२ गाड्या तैनात केल्या आहेत. त्यामध्ये चारचाकी आणि दुचाकींचा समावेश आहे. प्रत्येक गाडीवर दोन कर्मचारी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात १०४ कर्मचारी कायम दक्ष असतात.
-----
* स्वतंत्र नियंत्रण कक्षासह २४ तास सेवा
रत्नागिरीत पोलिस मुख्यालयासमोरील इमारतीमध्ये डायल ११२ चे नियंत्रण कक्ष आहे. येथे तीन संगणकावर तीन प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त केले आहेत. परंतु जिल्ह्यात तेवढे काम नसल्याने दोन संगणकावरच काम चालते. येणाऱ्या प्रत्येक कॉलचा पाठपुरावा करून संबंधित पोलिस ठाण्याच्या अंमलदारासह ११२ व्हॅनला त्याचा संदेश पाठवला जातो. त्या निश्चित ठिकाणावर संबंधित पोलिस कर्मचारी गाडी घेऊन जातात. जाण्यापूर्वी आलेल्या कॉलवर पुन्हा कॉल करून अंदाज घेतला जातो. त्याला योग्य तो प्रतिसाद देत मदत केली जाते. परंतु यावर नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जाते. त्यामुळे तिथे काय घडले आहे, याची पूर्ण कल्पना कक्षाला असते.
---------
* पाच महिन्यांमध्ये ३ हजार १५५ कॉल्स
जानेवारी ते मे २०२५ या पाच महिन्यामध्ये डायल ११२ नियंत्रण कक्षामध्ये ३ हजार १५५ कॉल प्राप्त झाले. या सर्व कॉलना अवघ्या ९ मिनिटांमध्ये प्रतिसाद दिला जात असल्याचे दिसून आले. यामध्ये घरामध्ये वाद झाल्याचा, आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा, मारहाण, या कॉलचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये पोलिसांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे जीव वाचले आहेत. कौटुंबिक वादामध्ये पोलिस वेळीच दाखल झाल्याने काही अनर्थ देखील टळले आहेत. त्यामुळे ही सेवा अनेकांना एक वरदान ठरत आहे.
-------
* सर्वांत जास्त महिलांच्या तक्रारी
कौटुंबिक वादाचे प्रसंग सर्वांत जास्त घडत असतात. त्यासाठी महिलांना ११२ हा मोठा आधार बनला आहे. सासु-सुनेचे भांडण, पतिपत्नीचा वाद, छेडछाड, यासाठी महिलांनी केलेल्या कॉलवरुन त्यांना तातडीने प्रतिसाद देत संरक्षण दिले जाते. पाच महिन्यांच्या कालावधीत अशा प्रकारे ८२६ महिलांनी विविध कारणासाठी तक्रारी केल्याची नोंद नियंत्रण कक्षात आहे. या सर्व तक्रारींना डायल ११२ ने जलद प्रतिसाद देऊन त्यावर तोडगा काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
------
* १४७ ज्येष्ठांना मिळाला आधार
ज्येष्ठ नागरिकांना घरातील भांडणातून दिला जाणार त्रास, घराबाहेर काढण्याचे प्रकार, मालमत्तेचा वादातून होणारी मारहाण, इतर तरुणांकडून दिला जाणारा त्रास, अशा १४७ तक्रारी दाखल झाल्या. अशा तक्रारींचीही तत्काळ दखल घेऊन संबंधितांना मदत करण्यात आली. विशेषतः वाट चुकलेल्या अनेक वयोवृद्धांना देखील सुखरूप त्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम किंवा मदत डायल ११२ ने केली आहे.
------
* ३०९ अपघातस्थळी तातडीची मदत
जिल्ह्यात ठिकठिकाणी घडणाऱ्या अपघातांची माहिती डायल ११२ वर कळवली जाते. घटनास्थळी जखमी अवस्थेत अडकलेल्या व्यक्तींना तातडीने मदत करून त्यांचा प्राण वाचविण्यात या टीमला यश आले आहे. पाच महिन्यात जिल्ह्यात ३०९ अपघातामध्ये डायल ११२ मदत केली आहे. अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडी हटविण्यासह वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यात यश आले आहे.
-------
* चौकशीचे ५१ ते १०० कॉल
डायल ११२ वरील विश्वास वाढला आहे. त्यामुळे मुलांपासून अगदी महिला, तरुणी, वयोवृद्ध देखील वेगवेगळ्या माहितीसाठी यावर फोन करतात. गेल्या पाच महिन्यांमध्ये चौकशीसाठी ३४८ कॉल आले आहेत. त्याचबरोबर अगदी वैद्यकीय मदत हवी यासाठी पाच महिन्यात २८ कॉल सेंटरला आले आहेत. इतर माहितीचे सुमारे २०० कॉल आल्याची नोंद आहे. दिवसाला साधारण ३० ते ३५ कॉल येतात.
------------
* फेक कॉलबाबत गुन्हा दाखल
अडचणीत सापडलेल्या अनेकांना तत्काळ मदत मिळावी. आत्महत्या करणाऱ्या, चोरीचा प्रयत्न, मारहाण आदीबाबत तत्काळ मदत करून डायल ११२ ने अनेकांचे जीव वाचवले आहेत. परंतु काही रिकामटेकडे याचा गैरफायदा घेऊन फेक कॉल करतात. त्यांना देखील पोलिस यंत्रणेने अद्दल घडवली आहे. फेक कॉल करणाऱ्या एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
--------------
चौकट
....यांना मिळाली तातडीची मदत!
समुद्रात अडलेल्या दोघांना वाचवले
* ठिकाण टेबल पॉइंट रत्नागिरी ः एक तरुण आणि तरुणी समुद्राच्या पाण्यात फसले आहेत. पाण्याचे प्रमाण वाढत आहे. पोलिस मदत हवी असल्याबाबत ११२ वर फोन आला. त्यावेळी अंमलदार व टीम घटनास्थळी तत्काळ जाऊन भाट्ये येथील समुद्र किनाऱ्यावरील खडकाळ भागात पाण्यात अडकलेल्या दोघांना वाचविण्यात आले. या दोन्ही मुलांना वेळेत मदत करून तेथील ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यातून सुखरूप बाहेर काढल्यामुळे दोन्ही मुलांचे प्राण वाचले.
-----------
* गुरांची बेकायदेशीर वाहतूक रोखली
ठिकाण पोमेंडी (गुहागर) ः गाडीमध्ये गुरे भरून तस्करी करून चिपळुणच्या दिशेने निघून जात असल्याबाबत फोन आला. त्या गाडीमधून २ व्यक्ती उतरले आहेत. त्यात एकाला पकडले आहे. पोलिस मदत हवी असल्याबाबत फोन आल्यानंतर ईआरव्हीचे रिस्पॉन्डर ड्युटीचे अंमलदार श्री. साळवी हे तत्काळ घटनास्थळी गेले. पोमेंडी येथून पिकअप गाडीमध्ये गुरे भरून चिपळूण दिशेला घेऊन जात असल्याचे सांगितले. अंमलदार हे या ठिकाणी तत्काळ रवाना झाले. संबंधित गाडी ही चिपळूण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिळून आली. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला आहे.
-----------
* श्वसनाचा त्रास होणाऱ्या मुलावर झाला वेळीच उपचार
पाली (ता. रत्नागिरी) ः पाली येथून एकजण दारू पिऊन गोंधळ करत आहे. खूप त्रास देत असून पोलिस मदत हवी असल्याचा दूरध्वनी आल्यानंतर अंमलदार कळंत्रे तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि चौकशी केली. त्यावेळी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही, श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले. मुलाला डॉक्टर उपचाराची तत्काळ गरज असल्यामुळे १०८ अॅब्युलन्सला बोलावून मुलाला तत्काळ डॉक्टरांकडे नेऊन वेळीच औषधोपचार करण्यात आले. त्यामुळे मुलाचे प्राण वाचले आहेत.
-----
* अपघातात अडकलेल्या चालकाला दिले जिवदान
ठिकाण हातखंबा (ता. रत्नागिरी)ः या ठिकाणी ५ ते १० मिनिटांपूर्वी अपघात झाला असून एक कंटेनर उलटला आहे. कंटेनरमधून धूर येत आहे. आग लागू शकते. कंटेनरमधील डिझेल सांडले आहे, असा दूरध्वनी आल्यानंतर अंमलदार श्री. पालवे यांनी संबंधित कॉल रत्नागिरी ग्रामीण डायल-११२ एम.डी.टी.वर असाईन केला. अंमलदार श्री. गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. संबंधित ठिकाणी कंटेनर उलटलेला दिसून आला. त्यामध्ये कंटेनर चालक दिलीप कुमार हे अडकले असल्याने तातडीने क्रेन बोलावून, क्रेनच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा प्राण वाचले. तसेच संबंधित कंटेनर क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या सुरक्षित ठिकाणी ठेवून मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
-------------
चौकट
वर्षाला येणारे कॉल...
वर्षे कॉल
* सप्टेंबर २०२१ - २१९
* २०२२ - २४६४
* २०२३ - ३५५२
* २०२४ - ५८२७
* २०२५ - जून- २४३०
----------------
जानेवारी ते ३० मे २०२५ या दरम्यान डायल ११२ ला प्राप्त झालेले कॉल
कॉलचे प्रकार जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे
महिलांबाबतचे कॉल.... १२६ १३५ १७४ १७२ १२०
ज्येष्ठ नागरिक १६ २८ ३० ३६ ३७
लहान मुलांबाबत ८ १० ६ ५ ४
अपघात ५१ ४६ ६३ ५० १२७
चौकशी ५४ ५५ ७२ ६७ १००
वैद्यकीय मदत ३ ९ ५ ३ ८
माहिती ३२ ३६ ३८ ३९ ५२
मदतीसाठी ४५ ६३ ४४ ५४ ८६
शाब्दिक वादावादी १५ २७ २२ २२ ३३
प्राण्यांशी निगडीत ५ ० १ ५ ३
मृतदेह ३ १ ३ १ ०
आगीबाबत माहिती ५ ७ ११ ६ ६
हरवलेल्या व्यक्ती ० २ ० १ ४
इतर गुन्हे १०३ ११७ १०२ १३७ १४९
दंगल ० २ ४ ० १
-------
कोट १
डायल ११२ ही प्रणाली लोकांच्या मदतीसाठी विकसित केली आहे. पूर्वी १०० नंबर आपल्या सर्वांना माहिती होता. हातखंब्यात गॅस टॅंकर उलटला ही माहिती देखील ११२ वरून मिळाली होती. त्याला साडेनऊ मिनिटामध्ये प्रतिसाद दिला होता.
- नितीन बगाटे, पोलिस अधीक्षक रत्नागिरी
-------
कोट २
समाजातील आबालवृद्धांचा ११२ वर विश्वास आहे. त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही. नागरिकांनी कोणतीही अडचण असल्यास या सेवेचा लाभ घेतला पाहिजे. याची जनजागृती गावागावात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- जयश्री गायकवाड, अप्पर पोलिस अधीक्षक
---------------
कोट ३
संपर्क साधल्यानंतर संबंधित व्यक्तीची माहिती मशिनवर येते. प्रत्येक गाड्यावर एमडीटी मशीन बसविलेले आहे. त्याच्यावर ती माहिती येते. त्या घटनेच्या जवळ जी गाडी आहे, ती पाठवली जाते. तिथे पोलिस ठाण्याच्या हद्दीचा संबंध येत नाही. तत्काळ संबंधिताला मदत मिळणे हा उद्देश आहे. घटनास्थळावरून निघताना एक बटन दाबायचे आणि पोचले की अरायव्हल बटन दाबायचे. त्यामुळे किती वेळेत मदत पोहोचली हे समजते.
- नीलेश माईनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नागिरी
-----------
कोट ४
गेली दोन वर्षे या प्रकल्पावर काम करीत आहे. त्याचा दुरुपयोगही अधिक केला जात आहे. लोक काहीही कॉल करतात. आम्हाला ते सांगायलाही बर वाटत नाही. अनेकांना त्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे अडचणीत मदत मिळावी, याचा चांगल्या उद्देशाने उपयोग व्हावा.
- दिलिशा आंब्रे, पोलिस हवालदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.