रामपूरमध्ये काजू पिक
लागवडीचे प्रात्यक्षिक
चिपळूण : तालुक्यातील मांडकी-पालवण येथील गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयात जय किसान ग्रुपच्या कृषिदुतांनी रामपूर येथे कृषी खात्यातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून क्लायमेट रिसायलेंट अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी या फळपीक लागवड तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक शेतकरी पांडुरंग कातकर यांच्या शेतात दाखवले. या वेळी कृषिदुतांनी व कृषी अधिकाऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. हवामान प्रतिरोधक शेती या तंत्रात पाण्याचा कमी वापर करून उत्पादन सुधारले जाते. यामध्ये विशिष्ट परिमाणासह खड्डे खोदणे, पाणी आणि पोषक तत्त्वांचे शोषण सुलभ करण्यासाठी वाळू आणि कंपोस्टने भरलेले पाईप ठेवणे धोरणात्मक आहे.
----------
रामपूर जेसीबी संघटना
अध्यक्षपदी प्रितम वंजारी
चिपळूण : रामपूर मार्गताम्हाणे पंचक्रोशी जेसीबी असणाऱ्या संघटनेची बैठक झाली. या बैठकीत रामपूर-मार्गताम्हाणे जेसीबी पंचक्रोशी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रितम वंजारी, उपाध्यक्ष दिनेश सावंत, खजिनदार तात्या थरवळ, शुभम चव्हाण यांची निवड झाली. बैठकीत सतीश इंदुलकर, शुभम चव्हाण, बाबा शिर्के, प्रितम वंजारी, तात्या थरवळ, बाप्पा निवळकर, सुनील हळदणकर, अजित थरवळ, बाबा जाधव, प्रसाद लकेश्री, ऋषिराज थरवळ सदस्य उपस्थित होते. परराज्यातील जेसीबींना रामपूर मार्गताम्हाणे चिपळूण तालुक्यात येऊ न देण्याचा एकमुखी निर्णय सर्वांनी घेतला. स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत, ही भूमिका घेण्यात आली.
----------
परशुराम संस्थेमध्ये
शिक्षक कार्यशाळा
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटीने संस्थेच्या पाचही शाळांतील शिक्षकांसाठी एक दिवसाची कार्यशाळा घेतली. मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा या सामाजिक संस्थेद्वारे शिक्षकांसाठी ही एकदिवसाची कार्यशाळा झाली. या संस्थेमध्ये पूर्णवेळ कार्यरत असलेले मयूर चंदने व उमा चंदने या जीवनदानी साधकांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. मनशक्ती केंद्राचे बाळासाहेब हेमाडे, नाईक उपस्थित होते. या संस्थेच्या कार्याची एक छोटी चित्रफीत सुरवातीला दाखवण्यात आली. त्यानंतर तीन सत्रात वेगवेगळ्या विषयांवर ही कार्यशाळा घेण्यात आली.
------
कुटरे शाळेचे सुयश
चिपळूण : ध्येय प्रकाशनअंतर्गत आय अॅम विनर शिष्यवृत्ती परीक्षा पहिली ते सातवी कोसबी केंद्रात घेण्यात आली. कुटरे शाळेचे तीन विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ते तिन्ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, चौथीमधील आर्या मोरे जिल्ह्यात पहिली व ऋषिकेश मोरे चिपळूण तालुक्यात द्वितीय व समर्थ सावरटकर हा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. मुख्याध्यापिका आंग्रे व वर्गशिक्षिका चांदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.