72533
पालकमंत्री नीतेश राणेंना
दत्ता सामंतांकडून शुभेच्छा
मालवण, ता. २३ : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नीतेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी मंत्री राणे यांची भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दीपक पाटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
---
72534
गणित प्रज्ञाशोध परीक्षेत
श्रीवर्धन पारकरला सुवर्ण
मालवण, ता. २३ : महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या उच्च काठिण्य पातळी असणाऱ्या गणित प्रज्ञाशोधपरीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवतळे मालवणचा विद्यार्थी श्रीवर्धन पारकर याने शिष्यवृत्तीसह सुवर्णपदक प्राप्त केले. प्रज्ञाशोध परीक्षेच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत गोल्डन कॅटेगरीत येणारा तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वस्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.