rat23p22.jpg-
72540
रत्नागिरी ः सत्कोंडी शाळेतील छपरावर बसवलेले सोलार युनिट.
----------
सत्कोंडी, कांबळेलावगण शाळांतील बिलांची बचत
पंचम प्रकल्पः सोलार प्रकल्पातून ८ किलोवॅट वीजनिर्मिती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ः तालुक्यातील सत्कोंडी व कांबळेलावगण येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये ८ किलोवॅटचा सोलार प्रकल्प कार्यान्वित केला असून, या दोन्ही शाळा सौरशाळा झाल्या आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांनी पुरस्कृत केलेल्या पंचम एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पांतर्गत राबवण्यात आला आहे. पर्यावरणपूरक सोलार ऊर्जा निर्माण करून महावितरणला वीज देणाऱ्या जिल्ह्यातील या पहिल्याच शाळा ठरल्या आहेत.
महाराष्ट्र फाउंडेशनच्या सहाय्याने सत्कोंडी गावात पंचम एकात्मिक ग्रामविकास प्रकल्प राबवण्यात येत असून, या प्रकल्पाकरिता हेरिटेज कल्चर आर्ट अॅण्ड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी ही संस्था समन्वय संस्था म्हणून काम करत आहे. पंचम प्रकल्पांतर्गत शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि गरिबी निर्मुलन या पाच विषयांवर काम सुरू असून, पर्यावरणपूरक ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांना तब्बल साडेपाच लाख रुपयांचे सौरपॅनल बसवून तेथे सौरऊर्जा कार्यान्वित करण्यात आली आहे.
यामुळे सत्कोंडीमधील थोर समाजनेते स्व. अनंतराव बैकर बहुउद्देशीय संकुलातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रुपग्रामपंचायत कार्यालय, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, अंगणवाडी, महिला उद्योग प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा, वॉटर एटीएम या सर्व आस्थापनांना सौरऊर्जा पुरवठा सुरू झाला आहे. सोलार प्रकल्पामुळे दोन्ही शाळांची शून्य वीजबिल येणार आहेत. त्यामुळे दोन्ही शाळा व इतर आस्थापनांचे वर्षाचे सुमारे दोन लाख रुपयांची बचत होणार आहे.
दोन्ही सौरशाळांचे उद्घाटन महाराष्ट्र फाउंडेशनच्या संचालिका रेश्मा सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला दत्ता गुरव, चेतन वाघ, संतोष कांबळे, सत्कोंडीचे सरपंच सतीश थूल, उपसरपंच चंद्रकांत मालप, भाऊ काताळे, संजय बैकर, प्रकाश मालप, वैभव छत्रे, अजय काताळे, प्रणाली मालप, समिक्षा घाटे, निकिता शिवगण, कवी अरूण मोर्ये, केशवराव बलेकर, पोलिस पाटील श्रीकांत खापले, संजय बलेकर, सत्कोंडी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पालये, कांबळेलावगण शाळेचे मुख्याध्यापक सुशील वासावे उपस्थित होते.
चौकट
दोन शाळांत एवढी वीजनिर्मिती
सत्कोंडीमधील सोलार प्रकल्पात वर्षाला ७००० युनिटस वीज निर्माण होणार आहे तसेच कांबळेलावगण येथील प्राथमिक शाळा, अंगणवाडी वॉटर एटीएम, बोअरवेल यांना सौरऊर्जा पुरवठा सुरू झाला आहे. कांबळेलावगणमध्ये वर्षाला ४५०० युनिट्स वीजनिर्मिती होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.