swt2427.jpg
72852
वझरेः येथील वळणावर उलटलेला टेम्पो.
वझरेतील वळणावर अपघातांची मालिका
वाहतूक धोकादायकः मालवाहतूक करणारे दोन टेंपो अपघातग्रस्त
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २४ : वझरे येथील अवघड वळणावर अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या पंधरा दिवसांत एकाच ठिकाणी सात अपघात झाले आहेत. आज सकाळी पुन्हा मालवाहतूक करणाऱ्या दोन टेंपोंना अपघात झाला. त्यातील एक टेंपो पलटी झाला तर दुसरा घळणीत अडकला. एकाच वळणावर वारंवार होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत असून हा धोका टाळण्यासाठी उपयोजना करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे.
वझरे येथील एका वळणावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तीव्र स्वरुपाच्या वळणाचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने अपघात होत आहेच. प्रत्येक अपघातात वाहने वळणावरून घसरून खाली जाऊन घळणीमध्ये पलटी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आज सकाळच्या सुमारास एक टेंपो आयीहून दोडामार्गला येत होता. वझरेतील तीव्र वळणावर चालकाचा अंदाज चुकला आणि टेंपो थेट रस्त्यालगतच्या बाजूपट्टीवर उलटला. काही वेळाने त्या मागोमाग येणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअपला देखील अपघात झाला. अपघाताची माहिती स्थानिकांना समजतात ते मदतकार्यासाठी सरसावले.
जेसीबी आणून उलटलेला टेंपो सरळ केला. या अपघातात टेंपोचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या वळणावर वारंवार अपघात होत असून मागील काही अपघातांमध्ये चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले तर, काहींना गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिकांनी या वळणावर वारंवार घडणाऱ्या अपघातांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. संबंधित ठिकाणी चेतावणी फलकांचा अभाव, अपुरी प्रकाश व्यवस्था आणि वेगावर नियंत्रण नसणे अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या वळणावर अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. गतिरोधक बसवावेत, अशी मागणी होत आहे. स्थानिक प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी; अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.