कोकण

विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेची बिजे

CD

72926

विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेची बिजे

ऑलिंपिक दिन उत्साहात; जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध उपक्रमांना प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २५ ः आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन नुकताच साजरा झाला. यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी केवळ क्रीडा नव्हे, तर ऑलिंपिक मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात घोषवाक्य स्पर्धा, पोस्टर मेकिंग, संवाद सत्र अशा विविध उपक्रम पार पडले.
‘विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, मैत्री आणि परिश्रम यांचा सच्चा अर्थ पोहोचवणे’, असा कार्यक्रमाचा उद्देश होता. कणकवली माध्यमिक विद्यालय येथे क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड व क्रीडा अधिकारी शीतल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे गायकवाड यांनी ऑलिंपिकच्या मूळ संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या. जय भवानी इंग्लिश मीडियम स्कूल, मालवण येथे क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तर कुडाळ हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे क्रीडा मार्गदर्शक माधुरी घरल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांनी केवळ एक दिवसाचा उत्सव न राहता विद्यार्थ्यांच्या मनामनात चिरकालासाठी ऊर्जा, अनुशासन आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेची बिजे रोवली गेली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आला आणि ऑलिंपिक दिनाचा संदेश जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यात यश मिळवले.
...................
तेंडोली हायस्कूलची उल्लेखनीय कामगिरी
परशुराम नाईक हायस्कूल तेंडोली या शाळेने कार्यक्रमाचे कल्पक नियोजन करून ''फिटनेस रन'', पोस्टर प्रदर्शन, घोषवाक्य लेखन व सामूहिक शपथविधी यांचे संयोजन केले. त्यामुळे ऑलिंपिक मूल्यांची जाणीव अधिक ठळकपणे विद्यार्थ्यांमध्ये रुजली. या सर्व उपक्रमांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांचा उल्लेखनीय सहभाग लाभला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फिलिपिन्समध्ये भूकंपाने विध्वंस! इमारती कोसळल्या, ६० जणांचा मृत्यू; धक्कादायक VIDEO VIRAL

Gold-Silver Price Today: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव वाढले; तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सोने बाजाराला झळाळी

Men Infertility Reasons: 'या' 3 सवयी ठरतात पुरुषांमधील इनफर्टिलिटीचे मुख्य कारण, आजपासूनच लाइफस्टाइलमध्ये करा बदल

Maruti Suzuki S-Presso: फक्त 1,999 रुपये EMI; कंपनीची ऑफर, विकल्या 80 हजार गाड्या

SCROLL FOR NEXT