कोकण

-कोकणदीप शिक्षक रत्न पुरस्कार

CD

- rat२५p२.jpg-
P२५N७२९५१
भक्ती सावंत

प्राचार्या भक्ती सावंत यांना
कोकणदीप शिक्षकरत्न पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. २५ ः शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना कोकणदीपमार्फत दिला जाणारा ''कोकणदीप शिक्षकरत्न पुरस्कार २०२५'' दापोली तालुक्यातील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गावतळेच्या प्राचार्या भक्ती सावंत यांना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दादर येथील सुरेंद्र गावस्कर सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. सावंत यांचा शिक्षकीप्रवास ८ ऑगस्ट १९९३ ला वाकवलीतील डॉ. विश्राम रामजी घोले हायस्कूलमधून सुरू झाला. ऑगस्ट २०२४ ला त्या श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गावतळेमध्ये प्राचार्या म्हणून रूजू झाल्या. सुमारे ३१ वर्षाच्या सेवेत शिवाजी हायस्कूल करंजाणी व जामगे हायस्कूलमधील शैक्षणिक वाटचालीत विद्यार्थी हे दैवत मानून त्यांनी सेवा केली व त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम आता IPL 2026 स्पर्धेवरही? १९ वा हंगाम पुढे ढकलला जाणार? अध्यक्षांनी दिले अपडेट्स

Supreme Court: देशात पहिल्यांदाच! ३२ वर्षीय तरुणासाठी सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला मंजुरी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : NCERT पुस्तकांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

Paduka Darshan Mumbai : मुंबईत दोनदिवसीय ‘भक्तीचा महाकुंभ’,‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’तर्फे संत आणि सद्‍गुरू पादुकांच्या दर्शनाची संधी

SCROLL FOR NEXT