कारूळ सातगावातील विद्यार्थ्यांचा गौरव
गावतळे, ता. २५ ः दापोली तालुक्यातील कारूळ-सातगाव विभाग आणि कारूळ सातगाव महिला मंडळ यांच्यावतीने नुकताच महिला वर्धापनदिनी विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम घेण्यात आला.
कारूळ येथे झालेल्या या या कार्यक्रमासाठी मुंबईहून अनेक मान्यवर उपस्थित होते. समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा, वारकरी संप्रदायातील मंडळी, ग्रामीण सातगाव महिला समितीतील सर्व आजी-माजी सदस्य आदींचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच सातगावमधील निराधार असलेल्या महिलांना साडीवाटप, निराधार पुरुष यांनाही मदत असे विविध कार्यक्रम पार पडले. सातगावअंतर्गत ग्रामीण ठिकाणी शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. महिलांचा वर्धापनदिन कार्यक्रमाचे औचित्य साधून महिलांच्यावतीने अखिल दाभोळखाडी भोई समाज महिला समितीच्या अध्यक्षा जयश्री सैतवडेकर, शासकीय पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या राब गावातील पाटेकर, शिक्षणक्षेत्रात मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या पांगारी महाकाल वाडीतील नम्रता मेढेकर, तसेच शासनाचे कांदळवन विभागात कार्यरत असलेल्या पंधेरी गावच्या कीर्ती निवाते आदींचा सन्मान करण्यात आला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.