rat२५p३.jpg-
P२५N७२९५२
रत्नागिरी : फाटक हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या हरिहर करमरकर याला बक्षीस देताना सीए नयन सुर्वे. सोबत संस्थाध्यक्ष अॅड. बाबा परूळेकर व अन्य.
उद्दिष्टपूर्तीसाठी जिद्दीने प्रयत्न करा
नयन सुर्वे ः फाटक हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : सहकार्यातून उद्दिष्टपूर्तीसाठी जिद्दीने प्रयत्न करा. तुमच्या क्षमता आणि मर्यादा ओळखून परिस्थितीला सामोरे जा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, असे आवाहन सीए नयन सुर्वे यांनी फाटक हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यी सत्कार समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून काढले.
फाटक हायस्कूल व श्रीमान वि. स. गांगण कला, वाणिज्य आणि त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात एसएससी व एचएससी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. मंचावर दी न्यु एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परूळेकर, कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.
फाटक प्रशालेत २०१३च्या दहावीच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थिनी आणि सीए परीक्षेत महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक प्राप्त माजी विद्यार्थिनी नयन सुर्वे यांचा या प्रसंगी अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत हरिहर करमरकर, आर्यन कुंभार, आर्या कुंभार, आदिती फडके, गार्गी करमरकर, विश्वराज यादव, नीरजा कडवेकर या प्रथम पाच क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांसह विविध विषय व तुकड्यांतील प्रथम क्रमांकांना आणि ८९ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त ४१ गुणवंतांना रोख रक्कम व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. एकूण ५४ विद्यार्थ्यांना ४२ हजार ८५०ची रोख रक्कम आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
-----
बारावीतील गुणवंतांचा सन्मान
बारावीच्या परीक्षेतील कला शाखेतील मुक्ता गावडे, श्रेया कुरधुंडकर, वृणाली शिवलकर; वाणिज्य शाखेतील वेदिका गोलिवडेकर, रूची तेरवणकर, शर्वरी शेंबेकर; विज्ञान शाखेतील अबान मुजावर, वाघेश्वरी कुलकर्णी, वैभवी जामनेकर यांना गौरवण्यात आले. मंजिरी आगाशे, दिनेश नाचणकर, अनंत जाधव, राजाराम पानगले या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.