कोकण

स्पर्धात्मक युगात गुणवत्तेच्या बळावर जग जिंका

CD

73003

अधिकारी होण्याची स्वप्ने उराशी बाळगा

आर. एल. परब ः परब समाजातर्फे कुडाळात गुणगौरव सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २५ ः सिंधुदुर्गातील विद्यार्थी गुणवत्ताधारक आहेत. मात्र, शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. हे जग खूप प्रगत झाले आहे. सोशल मीडियाचा वापर करताना मोबाईलचा अनावश्यक वापर टाळा. सद्गुण अवगत करा, अवगुणांचे विसर्जन करा. जमेल तेवढे विद्यादान करा. कोणत्याही क्षेत्रात पुढे येऊन नाव उज्वल करा. मात्र, मातीशी जोडलेली नाळ कायम ठेवा, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख ऋषिकेश परब यांनी केले.
सावंतवाडी संस्थान मराठा समाज हॉल कुडाळ येथे परब मराठा समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांचा दहावी-बारावी गुणगौरव कार्यक्रमात श्री.परब बोलत होते. यावेळी अध्यक्ष आर. एल. परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले.
या कार्यक्रमावेळी जिल्ह्यातील दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या परब मराठा समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. दहावी, बारावी उत्तीर्ण ८७ विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. संविता आश्रमचे संदीप परब म्हणाले, ‘‘जिल्ह्यात चांगली निसर्ग संपत्ती आहे. तुम्ही दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्लंबिंग, ड्रायव्हिंग तसेच, लाईटिंग यांसारखी कामे करायला शिका. युपी-बिहारच्या लोकांनी आपल्या जिल्ह्यात येऊन बंगले बांधले. मात्र, आपल्या मुलांना नोकरीनिमित्त मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जावे लागते, हे दुर्दैवी आहे. बुद्धिमत्ता आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोठेही यश मिळवू शकता. मोबाईलचा वापर वाढल्याने अभ्यासाची सवय कमी झाली आहे. चांगले संस्कार आणि शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हा. आपल्या आई-वडिलांची सेवा करा.’’
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या महिला जिल्हाध्यक्ष मानसी परब, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, श्रेया परब, राजन परब, जयेंद्रथ परब, आर. एल. परब, गुरुदास परब, बाळकृष्ण परब, शैलेंद्र परब, समीर परब, मनोहर परब, शैलेंद्रकुमार परब, सुशील परब, विनोद परब आदींनी मार्गदर्शन केले. गुरुदास परब यांनी प्रस्तावना केली. शुभम परब यांनी सूत्रसंचालन केले. महादेव परब यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Latest Marathi News Update : आज कुठे काय घडलं? पाहा एका क्लिकवर...

स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

SCROLL FOR NEXT