गणपत्ये, दाभोळकरांनी उलगडला प्रवास
सायकलिंग क्लबचे स्नेहसंमेलन ; सदस्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ मध्ये सायकलिंग करतानाचे डॉ. तेजानंद गणपत्ये यांचे अनुभव, सायकलिंग प्रशांत दाभोळकर यांनी उलगडलेला प्रवास, सायकलिंगविषयक क्विझ अशा विविध कार्यक्रमांनी चिपळूण सायकलिंग क्लबचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
चिपळूण येथे २०२० मध्ये सायकलिंग क्लबची स्थापना झाली. जून महिन्यात वर्धापनदिन साजरा करण्याची परंपरा यंदाही जपली गेली. या वेळी भारती तारे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. या प्रसंगी विविध स्तरांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा गौरव करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या क्लब सदस्यांचे पाल्य, सायकलिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे सदस्य, कुंभार्ली घाट फिनिश राईड पूर्ण करणारे सदस्य, फिनिशर मेडल व २०२४ कॅलेंडर वर्षात सर्वाधिक अंतर सायकलिंग करणारे तीन पुरुष व महिला रायडर्स् तर रायडर्स दा टशन चॅलेंज विजेते या सर्वांचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी आपले अनुभव सांगितले. दक्षिण आफ्रिकेतील ९० किलोमीटर अंतराची जगप्रसिद्ध ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ बाबत आपली प्रेरणादायी कहाणी मांडली. याच कार्यक्रमात नीशा आंबेकर आणि मनोज भाटवडेकर यांनी घेतलेल्या सायकलिंगविषयक क्विझने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. अचूक व वेगाने उत्तरे देणाऱ्या विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गप्पागोष्टी सत्रात आजपर्यंत तब्बल ४६ हजार किलोमीटर सायकलिंग करणारे प्रशांत दाभोळकर यांनी आपला १२०० किलोमीटरचा एलआरएम सायकलिंगचा प्रवास उलगडला. त्यासोबत हा प्रवास पूर्ण करणारे राघव खर्चे यांनीही आपल्या अनुभवांमध्ये सहभागी होत प्रेरणादायी क्षण उपस्थितांसमोर उभे केले. या वेळी सदस्यांनी पुढील वर्षी बीआरएम, लॉंग डिस्टन्स टुरिंग, स्पर्धा, चॅलेंजेस व सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.