73010
सिंधुदुर्गात ‘यूपीएससी’ संस्कृती निर्माण व्हावी
परेश बांदेकर ः कुडाळात स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात यूपीएससी स्पर्धा परीक्षा संस्कृती निर्माण झाली पाहिजे. ती निर्माण करुया. त्यासाठी येथील विद्यार्थी यूपीएससी परीक्षेकडे वळले पाहिजेत. आवश्यक ते मार्गदर्शन आमच्याकडून नेहमीच दिले जाईल, अशी माहिती अॅकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे परेश बांदेकर यांनी दिली.
कुडाळ हॉटेल लाइमलाईट येथे मंगळवारी (ता. २४) सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभियंते निखिल खानोलकर आणि विवेक देसाई उपस्थित होते. यावेळी बांदेकर यांनी यूपीएससीचा इतिहास सांगितला.
बांदेकर म्हणाले, ‘‘अजूनही यूपीएससी, एमपीसीसी यांची पुरेशी संकल्पना विद्यार्थ्यांना नाही. विद्यार्थी-पालक यांच्यामध्ये अजून याबाबत जागृती झाली पाहिजे. आज ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश, बिहार येथून विद्यार्थी यूपीएससीची परीक्षा देतात आणि अधिकारी होतात, ते अजून आपल्याकडे होताना दिसत नाही. आता याबाबतचे मार्गदर्शन या संस्थेमार्फ़त कुडाळमध्ये दिले जाणार आहे. एनडीए आणि सीडीएसबाबतचे मार्गदर्शन सुद्धा दिले जाणार आहे. हॉस्टेलची सुविधा असून चहा, नाश्ता, जेवण सुद्धा दिले जाईल. यामागचा हेतू फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे एवढाच आहे.’’
------
‘यूपीएससी’ हे एक देशसेवेचे व्रत!
खानोलकर यांनी देखील आपला यूपीएससीचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, ‘‘यूपीएससीला जॉब समजू नका तर ते एक देशसेवेचे व्रत आहे असे समजून अभ्यास करा. यूपीएससीमुळे तुम्हाला अनेक विषय समजतात. त्यासाठी योग्य तयारी करावी लागते. आता सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अशाप्रकारचे मार्गदर्शन मिळू शकते.’’ युपी, बिहारमध्ये प्राथमिक शिक्षणापासून यूपीएससी करायचे हे ठरलेले असते. त्यामुळे जी जागरूकता निर्माण करण्याचे काम ही संस्था नक्की करेल, असा विश्वास खानोलकर, बांदेकर यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.