कोकण

-पालिकेच्या निवडणुकांचा बार दिवाळीनंतर 0

CD

पालिका निवडणुकांचा बार दिवाळीनंतर?
प्रभागरचनेच्या अधिसूचनेसाठी मुदतवाढ ; नव्या मुहुर्ताची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ : महापालिका व नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. या कार्यक्रमानुसार दिवाळीच्या आसपास निवडणुका होतील, असा अंदाज होता; मात्र, अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळाली असून, तसा शासनादेशही काढला आहे. हे पाहता पालिका निवडणुकीचा मुहूर्त नव्या वर्षातच निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चिपळूण पालिकेवर चार वर्षापासून प्रशासक कार्यरत आहे. कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींची आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने निवडणूक प्रक्रिया लांबली. सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणूक घेण्याच्या निर्देशानंतर पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात आला. चार सदस्यांचा प्रभागाचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठीचे नोटिफिकेशनही काढण्यात आले. त्यानुसार ११ जूनपासून प्रगणक गटाची मांडणी, गुगल मॅपवर नकाशे तयार करणे, ३१ जुलैला प्रभागरचनेचा मसुदा तयार करणे, २२ ऑगस्टला प्रभागरचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवणे, ९ सप्टेंबरला प्रभागरचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास सादर करणे, त्यानंतर २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या प्रभागरचनेच्या अधिसूचनेस प्रसिद्धी असा कार्यक्रम आखून दिला होता. आता अंतिम प्रभागरचना अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी ३ ते ६ ऑक्टोबर अशी जवळपास एक महिन्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
----
दृष्टिक्षेपात
* १२ जूनला प्रसिद्ध वेळापत्रकात बदल
* प्रभागरचनेच्या कालावधीत वाढ
* अंतिम प्रभागरचना अधिसूचना ६ ऑक्टोबर रोजी
* निवडणुका किमान दोन महिने लांबण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Accident: सूर्योदय पाहून परतताना क्षणात सर्व संपलं… मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातात IIT च्या तीन विद्यार्थ्यांचा अंत

US Visa Bond Policy : डोनाल्ड ट्रम्प यांचा ५० देशांना दणका ! व्हिसा बाँड केला अनिवार्य, नेमकं काय आहे प्रकरण ?

Dharashiv:धाराशिवमध्ये गुढीपाडव्याला म्हशी-रेड्यांच्या शर्यतीचा थरार; परंपरेचा जल्लोष

Chhatrapati Sambhajinagar: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरखरेदीचा उत्साह; २५० गृहप्रवेशासह बाजारात तेजी

विद्यापीठाचा मोठा निर्णय! 'सीसीटीव्ही' असलेल्या कॉलेजमध्येच आता परीक्षा केंद्र; ‘लॉ’ची परीक्षा त्याच महाविद्यालयात, २ एप्रिलपासून परीक्षा, वाचा...

SCROLL FOR NEXT