कोकण

‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान’ भिसेंना जाहीर

CD

73058

‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज
राष्ट्रीय सन्मान’ भिसेंना जाहीर

कोल्हापूर येथे रविवारी पुरस्कार वितरण

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. २५ ः येथील प्रसिद्ध कलावंत व शाहीर प्रा. हरिभाऊ भिसे यांना कोल्हापूर येथील मानवतावादी सांस्कृतिक चळवळ व दीक्षा फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथे राजर्षी शाहू सांस्कृतिक भवन येथे रविवारी (ता.२९)
आयोजित एका खास समारंभात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. मानाचा कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह, मानपत्र, राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा आणि अकरा हजार रुपयांची ग्रंथ संपदा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्री. भिसे यांनी सिंधुदुर्गात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्राध्यापक भिसे हे नुकतेच कणकवली महाविद्यालयातून निवृत्त झाले असून ‘अक्षर सिंधू’, साहित्य कला मंच, सिंधुदुर्ग, सिंधुगर्जना ढोल-ताशा पथक, कणकवली, कणकवली अर्बन निधी बँक, ज्ञानदा शिक्षण संस्था संस्थापक आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे, आयडियल नर्सिंग स्कूल, वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन समिती सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष, रोटरी क्लब चार्टर मेंबर, सिंधुदुर्ग दक्षता समिती सदस्य, रंगखांब ग्रुप कणकवली, शाहिरी लोक कला गोंधळ लोककला मंच अशा विविध संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात समाज प्रबोधन कार्यात व लोककला जपण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. प्रा. भिसे यांच्या सर्वांगीण कार्याची दखल घेतल्याबद्दल जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रशासकीय व राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : सारे काही ‘गॅस’वर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 मार्च 2026

ओझे भयाचे...!

ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट्सचा वापर

स्पर्धा परीक्षांसाठी कोणती शाखा?

SCROLL FOR NEXT