कोकण

दातृत्वाचे संस्कार भविष्यात प्रेरणादायी

CD

73008

दातृत्वाचे संस्कार भविष्यात प्रेरणादायी

का. आ. सामंत ः कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून गरजूंसाठी मदत

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः शालेय जीवनात दातृत्वाचे झालेले संस्कार भविष्यात तुम्हाला एक मोठा दाता होण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल, असे प्रतिपादन कमशिप्र मंडळाचे उपाध्यक्ष का. आ. सामंत यांनी दिला. ‘ज्ञानयज्ञ-एक मदतीचा हात’ या संस्कारक्षम वर्गाने राबविलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
याप्रसंगी मुख्याध्यापक विपिन वराडे, उपमुख्याध्यापक प्रवीण भोगटे, पर्यवेक्षक रंजन तेली आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण दिल्यास ते दीर्घकाळ ध्यानात राहते. यासाठी कुडाळ हायस्कूल नेहमीच कृतियुक्त शिक्षणावर भर देते. दुसऱ्याचा सहृदयतेने विचार करणे, त्याच्या गरजा ओळखून योग्यवेळी योग्य ती मदत करणे या गोष्टी माणूसकीसाठी पोषक आहेत. याचाच एक भाग म्हणून इयत्ता दहावीच्या वर्गातील मुलांचा संस्कारक्षम वर्ग कार्यरत आहे. या वर्गातर्फे ‘ज्ञानयज्ञ-एक मदतीचा हात’ हा उपक्रम राबविण्यात आला.
दरम्यान, प्रवीण भोगटे, रंजन तेली यांनीही सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रशालेचे शिक्षक एकनाथ जाधव यांनी मुलांना वस्तुरूपाने मदत करीत मुलांचा उत्साह वाढविला. या संस्कारक्षम वर्गाचे संस्थापक व मार्गदर्शक म्हणून प्रशालेचे सहाय्यक शिक्षक सुरेंद्र गोसावी काम पाहतात. त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला. वर्गशिक्षक मंदार देऊसकर, विनोद तांबडे यांनीही कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केदा घाटगे, रुद्र कुडकर, प्रेम ओंबासे, तन्मय नाडकर्णी, अथर्व पट्टेकर, गौरव जुवेकर, दीपेश मसुरकर, अथर्व तवटे, रोहित खाकर या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. सुधांशू महेश धुरी यांनी सूत्रसंचालन केले. श्रेयश खोचरे याने प्रास्ताविक तर स्वराज मसुरकर याने आभार मानले.
----
खाऊच्या पैशातून गरजूंना मदत
या वर्गात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले खाऊचे पैसे किंवा साठविलेले पैसे गोळा करून त्यातून गरजू विद्यार्थ्यांसाठी एक रक्कम जमा केली. त्यातून आवश्यक शैक्षणिक साहित्याची खरेदी केली. प्रशालेतील होतकरू व गरजू अशा मुलांचा शोध घेऊन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू भेट म्हणून दिल्या. गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानयज्ञ तेवत ठेवण्यासाठी आपण एक छोटीशी मदत देत आहोत याचा आनंद सहभागी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मुख्याध्यापक वराडे यांनी मुलांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT