कोकण

कळसुलकर प्रशाळेमध्ये नव्या लोगोचे अनावरण

CD

73108

कळसुलकर प्रशाळेमध्ये
नव्या लोगोचे अनावरण

सावंतवाडी, ता. २५ ः सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडीच्या वाटचालीस १२५ वर्षे पूर्ण झाल्याने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून संस्था व प्रशालेतर्फे नव्याने तयार केलेल्या प्रशालेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेचा माजी विद्यार्थी सर्वेश माडेलकर याची भारतीय सैन्यात भरती झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष शैलेश पई यांनी संस्थेच्यावतीने सत्कार केला. व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्रसाद नार्वेकर, संचालक मुकुंद वझे, डॉ. स्वार, मोहन वाडकर, अण्णा म्हापसेकर, संचालिका राजश्री टिपणीस, नम्रता नेवगी, मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, पर्यवेक्षक सुबोध वराडकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, माजी विद्यार्थी सर्वेश मांडेलकर, पालक संघ सदस्य अरुण भिसे उपस्थित होते. प्रशालेच्या सभागृहामध्ये प्रशालेतील आनंद शिशुवाटिका विभाग, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. अनिल ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. दिगंबर सारंग यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Government Job Fraud : एकाच वेळी दोन-दोन सरकारी नोकऱ्या करत होता पठ्ठ्या, ३३ वर्षे घेतला पगार; कोर्टाने सुनावली ७ वर्षांची शिक्षा

हे, भाऊ शोभतात! बांगलादेशचे दोन्ही फलंदाज एका दिशेला, पाकिस्तानच्या खेळाडूंनी काय केलं पाहा Video Viral

Government Stray Dog Policy : शिकवायचं की कुत्री मोजायची? आता भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर? सरकारचा अजब फतवा, काय आहे नेमका प्लॅन?

Latest Marathi News Live Update : एलपीजी गॅस सिलेंडर टंचाईची झळ आता गडचिरोली शहराला

स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट, म्हणाल्या...'गेली दोन वर्ष मी...'

SCROLL FOR NEXT