कोकण

एक हजार विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

CD

73117

एक हजार गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

दिविजा वृद्धाश्रमाचा उपक्रम; आजी-आजोबांकडून नातवंडांना भेट

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २५ ः असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली व देवगड तालुक्यांतील एक हजार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी ग्रामीण भागांतील २९ शाळांतील एक हजार विद्यार्थ्यांना दिविजा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांकडून नातवंडाना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.
या भेटवस्तूंमध्ये दप्तर, लाँग बुक, वह्या, अंकलपी, कंपास बॉक्स, रंग खडू, पेन, पेन्सिल, पट्टी किट आदी वस्तूंचा समावेश आहे. काही प्राथमिक शाळांना कॅरम भेट देण्यात आले. इंग्लिश मीडियम स्कूल फोंडा येथील शिक्षक दत्तगुरू चव्हाण यांनी राबविलेल्या वाचनालय उपक्रमास आजी-आजोबांनी वाचलेली १०० पुस्तके भेट देण्यात आली.
असलदे वृद्धाश्रमातर्फे नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट, बाल शिवाजी इंग्लिश मीडीयम स्कूल कणकवली, जिल्हा परिषद प्राथमिक ऊर्दू शाळा नांदगाव, असलदे तावडेवाडी, बिडवाडी कणखरे, कळसुली क्र. १, वारगाव क्र.१, वारगाव क्र. ३, नांदगाव क्र.१, तोंडवली गावठण, तोंडवली क्र. १, असलदे क्र. १, असलदे गावठण, कोळोशी हडपीड हायस्कूल व प्राथमिक शाळा, कोळोशी वरचीवाडी, आयनल मणेरवाडी, हडपीड खालचीवाडी, शिरगाव राकसवाडी, साळशी क्र. १, शिरगाव आंबेखोल, शिरगाव निमतवाडी, शिरगाव-चौकेवाडी, शिरगाव क्र. १, महाळुंगे-राणेवाडी, तोरसोळे क्र. १, वळीवंडे क्र. १, ओंबळ गावठण बौद्धवाडी आदी शाळांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या उपक्रमाचे शाळा व पालकांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

MS Dhoni ला बसला स्पीडचा फटका, अतिघाईमुळे द्यावा लागणार 'इतक्या' रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण ?

Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT