कोकण

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बांद्यात विद्यार्थी जखमी

CD

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात
बांद्यामध्ये विद्यार्थी जखमी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ ः येथील पीएम श्री केंद्रशाळेत पहिलीत शिकणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यात तो जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. दरम्यान, त्याला ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते ओंकार नाडकर्णी, साई करमळकर यांनी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
शाळा व्यवस्थापन व शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नाडकर्णी यांनी करत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शाळा सुरू असताना विद्यार्थी मुख्य गेट उघडून बाहेर गेलाच कसा, असा प्रश्‍न नाडकर्णी यांनी उपस्थित केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, या विद्यार्थ्यावर कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्याने तो रडत उभा होता. याची माहिती ओंकार नाडकर्णी व साई करमळकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याला उपचारासाठी बांदा आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. गजानन सारंग यांनी उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. श्री. नाडकर्णी यांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत शाळेच्या वेळेत विद्यार्थी बाहेर गेला कसा आणि याबाबत शिक्षकांना कोणतीही कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : मुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT