कोकण

हुलकावणी दिल्याच्या रागातून मोटारचालकासह महिलांना मारहाण

CD

हुलकावणी दिल्याच्या रागातून
मोटारचालकासह महिलांना मारहाण

चिंदरमधील दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २५ ः हुलकवणी दिल्याच्या रागातून दुचाकीस्वार व मोटारचालक यांच्यात झालेल्या वादातून दुचाकीस्वाराने चालक आणि मोटारीतील तिघा महिलांना मारहाण केल्याची घटना चिंदर बाजार येथे मंगळवारी (ता.२४) रात्री घडली. या मारहाणीत त्या महिला जखमी झाल्या असून, त्यांना आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केले. मोटार चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी चिंदर बाजार येथील जेरी फॉरेन्स फर्नांडिस (वय ३९) या दुचाकीस्वरावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालक चैतन्य वसंत सावंत (रा. कोलझर, ता. दोडामार्ग) यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी माझ्या तीन महिला नातेवाइकांसह आचरा-कणकवली मार्गावरुन मोटारीने जात होतो. आम्ही चिंदर बाजार येथे पोहोचलो असता एक दुचाकीस्वार मोटारीमागून येत होता. तो माझ्या मोटारीला ओव्हरटेक करून निघून गेला. मात्र, पुढे जात त्याने दुचाकी वळवली व मोटारीच्या म्हणजे चालकाच्या बाजूने येत मला मोटार थांबवण्याचा इशारा करू लागला. तसेच दुचाकी मोटारीला घासून चालवू लागला. मी मोटार थांबवली असता त्याने खिडकीतून हात घालत माझी कॉलर पकडली व ‘मला हूल देतोस म्हणजे काय’ असे म्हणत शिव्या दिल्या. त्यानंतर मला मोटारीबाहेर खेचत मारहाण केली. माझ्यासोबत असलेल्या महिला नातेवाईक मला सोडवण्यासाठी आल्या असता त्यांनाही त्याने मारहाण केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आचरा पोलिस तुकाराम पडवळ, मिलिंद परब, विशाल वैजल, मनोज पुजारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मोटार चालकासह जखमी महिलांना येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर मोटारचालक चैतन्य सावंत यांनी येथील पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार चिंदर बाजार येथील जेरी फॉरेन्स फर्नांडिस याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Pandharpur Temple: पांडुरंगाचा लाडू प्रसाद निम्म्याच भक्तांनाच मिळणार; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईच्या झळा; उत्पादन निम्म्यावर!

Latest Marathi News Live Update : गॅस दरवाढीवरून रिक्षाचालकांचा संताप, गॅस पंपाला घेराव

भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी, एस जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर इराणचा मोठा निर्णय

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

SCROLL FOR NEXT