कोकण

''बॅ. नाथ पै''च्या विद्यार्थ्यांची बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

CD

swt२६४.jpg
७३२६४
कुडाळः जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेतील विजयी स्पर्धांकांसोबत बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर, क्रीडा शिक्षक रोहिदास राणे, चित्रा कुंटे, शमिका भिसे. (छायाचित्रः अजय सावंत)

‘बॅ. नाथ पै’च्या विद्यार्थ्यांची
बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ः बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या नीरजा पवार, स्वरा कोळी, विघ्नेश घोगळे व देवांश कोळी यांची महाराष्ट्र बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली. निरजा जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूची मानकरी ठरली.
येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत नीरजा पवारने चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ९ वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावले तर ११ वर्षांखालील गटात रौप्यपदकावर आपले नाव कोरले. या अप्रतिम कामगिरीबद्दल तिला उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ११ वर्षाखालील गटात स्वराने नीरजाला मात देत जिल्हा अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.
जिल्हा निवड बॅडमिंटन स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी सादर करत दुसरीतील विद्यार्थी विघ्नेश घोगळे याने अंतिम सामन्यात बाजी मारली. त्याने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्याचा २१-१६, २१-११ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत महाराष्ट्र बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. याच शाळेचा दुसरीचा खेळाडू देवांश कोळी याला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. प्रशालेच्या या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रशालेचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रोहिदास राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच या त्यांच्या यशाबद्दल सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी त्यांचे व त्यांच्या पालकांचे, क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत मुसळधार, विक्रोळीत दरड कोसळून बापलेकीचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

Mumbai Local Train : मुंबईत मुसळधार! मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल रखडल्या; प्रवाशांची पायपीट, उशिराने धावताहेत गाड्या

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबईसह मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असते तर युक्रेन युद्ध झालंच नसतं, अलास्कात बोलले पुतीन; म्हणाले, शांततेचा तोडगा काढा पण...

Jasprit Bumrah ला टीम इंडियात घेण्यासाठी केलेली शिफारस? इशांत शर्माने सांगितली इनसाईड स्टोरी; म्हणाला,'दुखापत झाली अन्...'

SCROLL FOR NEXT