-rat२६p१६.jpg-
२५N७३३४६
कोन्हवली : सुजाता आंबेकर यांच्या घराचे नुकसान झाले आहे.
----
मंडणगडात घरे, गोठ्यांसह शाळांचे नुकसान
सव्वासात लाखांची हानी; पशुहानीचाही समावेश
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २६ ः जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यापासून ९ घरे, ५ गोठे, सार्वजनिक वास्तू, पोल्ट्री यांची पडझड होऊन ७ लाख २५ हजार ६४० रुपयांचे नुकसान झाले आहे.
तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, वडवली येथील पार्वती गावणूक यांचे २४ हजार, माहू येथील नंदकुमार रेडीज यांचे २० हजार, चिंचघर येथील अनिता काणेकर यांचे घर १ लाख ३५ हजार, दहागाव येथील कल्पेश गांधी यांचे १ लाख ६५ हजार ६०० रुपयाचे नुकसान झाले. कुडुकखुर्द येथील भिकू चव्हाण यांचे ३० हजार, दहागाव येथील हुसैन जोगिलकर यांचे गोठ्याचे ३५ हजार, लाटवण येथील सुनील सकपाळ ९ हजार १२५, पिंपळोली येथील सहदेव गायकवाड यांचे १२ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. भोळवली येथील कल्पना गोपाळ यांचे ९ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले. पिंपळोली येथील अरूण विचार यांचे गोठ्याचे अंशतः नुकसान होऊन घराची पडझड झाल्याने ५७ हजार ५२५ रुपयांचे नुकसान झाले. चिंचघर येथील संतोष पिंपळकर यांचे घर अंशतः नुकसान होऊन घराची पडझड झाल्याने ९ हजारांचे नुकसान झाले. भोळवली येथील विठ्ठल कोकळे ६ हजार, भोळवली येथील सुजाता कोकळे ८ हजार ७५०, कादवण येथील सुभाष पवार ४ हजार ४००, आंबवणेखुर्द अंगणवाडीचे पावसात नुकसान झाल्याने १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले. केळवत येथील सागर भोगल यांच्या पोल्ट्रीची पडझड झाल्याने ७९ हजारांचे नुकसान झाले. मंडणगड हायस्कूलच्या इमारतीची पडझड झाल्याने ३५ हजारांचे नुकसान झाले. मंडणगड बाजारपेठेत योगेश खापरे यांच्या दुकानाची पडझड झाल्याने ३ लाखांचे नुकसान झाले. केंगवळ येथील राजेश शिगवण यांचा बैल वाहून गेल्याने ३५ हजारांचे नुकसान झाले.
---
भरपाई मिळावी...
पावसामुळे मंडणगड तालुक्यातील शाळांसह शेतकऱ्यांच्या घरांचे, गोठ्यांचे नुकसानीसह पशुधनाचीही हानी झाली. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.