कोकण

खासगी वसतिगृह संघटनेच्या कार्याध्यक्षपदी दयानंद कुबल

CD

74022

खासगी वसतिगृह संघटनेच्या
कार्याध्यक्षपदी दयानंद कुबल

बांदा, ता. २७ ः महाराष्ट्रातील खासगी वसतिगृह संघटनेच्या कार्याध्यक्षपदी दयानंद कुबल (मुंबई) यांची, अध्यक्षपदी महेश निंबाळकर (पुणे) तर सचिवपदी महेश यादव यांची नियुक्ती झाली.
बालकांच्या वसतिगृहात संस्थांचा स्तर वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू मुलांसाठी खासगी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वसतिगृहे चालवली जातात. मात्र, अलीकडील काही अपवादात्मक घटनांमुळे संपूर्ण वसतिगृह क्षेत्रच संशयाच्या छायेत सापडले आहे. परिणामी प्रामाणिकपणे कार्यरत संस्थांनाही नोटिसा, चौकशी आणि कारवाईचा सामना करावा लागत आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्यातील सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन खासगी वसतिगृह संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या उपाध्यक्षपदी ॲड. सुजाता अंगडी, सचिवपदी महेश यादव, सहसचिव अक्षदा भोसले, कोषाध्यक्ष विश्वास लोंढे, सदस्यपदी तेजस कोठावळे, ॲड. राजीव करडे, प्रसाद मोहिते, दत्ता इंगळे, शरद आढाव, मधुकर सोनवणे, सुधीर भोसले यांची निवड केली. ही संघटना शासकीय निकषांचे पालन करणाऱ्या संस्थांना संरक्षण देण्यासाठी, पारदर्शक कार्यपद्धती राबवण्यासाठी आणि बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे कुबल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT