कोकण

संस्कारमूल्ये आत्मिक समाधान देतील

CD

swt3028.jpg
74406
अणसूर पालः हायस्कूलमधील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

संस्कारमूल्ये आत्मिक समाधान देतील
विलास हरमलकरः अणसूर-पाल हायस्कूलमध्ये गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १ः ग्रामीण भागातील शाळेची १०० टक्के निकालाची परंपरा आणि विद्यार्थ्यांनी मिळविलेले सर्वोत्तम गुण कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत मिळविलेल्या ज्ञानाबरोबरच रुजलेले संस्कार, सद्भावना, नीतिमूल्ये भविष्यात आत्मिक समाधान देतील, असे उद्गार उद्योजक विलास हरमलकर यांनी अणसूर येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी काढले.
अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थेच्या वतीने हायस्कूलमधील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हायस्कूलच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये झाला. याप्रसंगी संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे, प्रमुख पाहुणे उद्योजक हरमलकर (गोवा), दीपक गावडे, नाना गावडे, राजन गावडे, सरपंच सत्यविजय गावडे, बिट्टू गावडे, वासुदेव बर्वे, अनंत मांजरेकर, प्रभाकर गावडे, दीपक गावडे, सेवानिवृत्त लिपिक सुधीर पालकर उपस्थित होते.
दहावी परीक्षेत हायस्कूलमधून प्रथम तीन क्रमांकांत उत्तीर्ण झालेल्या साहिल गावडे, धनश्री गावडे, लक्ष्मी तेंडोलकर या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट फोल्डर व पेनसेट तर चतुर्थ क्रमांक साहिल गावडे व तनिष्का राऊळ तसेच पाचवा क्रमांक प्राप्त धनश्री केरकर यांच्यासह इतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पेनसेट देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या वतीने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. संस्थाध्यक्ष गावडे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जीवन विद्या मिशन पुस्तिका भेट दिली. शाळेच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी हरमलकर यांनी आर्थिक निधी देण्याचे तर आठवीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वेंगुर्ले रोटरीचे अध्यक्ष आनंद बोवलेकर यांनी स्पोर्ट्स टीशर्ट देण्याचे जाहीर केले. सरपंच गावडे यांनी सरपंच मानधनाची रक्कम शैक्षणिक विकास कार्यासाठी संस्थेस देण्याचे जाहीर केले. पाल गावचे माजी सरपंच वासुदेव बर्वे यांनीही विद्यार्थी व शिक्षक परिवाराचे अभिनंदन केले. शाळा व संस्थेच्या वतीने हरमलकर आणि बोवलेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आत्माराम गावडे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून भावी जीवनात सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले. सेक्रेटरी लिलाधर गावडे यांनी दिलेल्या संदेशात विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी, सूत्रसंचालन विजय ठाकर, गुणगौरव अहवाल वाचन अक्षता पेडणेकर यांनी केले. आभार संचिता परब यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींवर कडक बंदी लागू करा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश, पर्यावरण-जलस्रोतांवर होतोय परिणाम!

Latest Marathi News Updates : पैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

जिवंत राहुदे पण मृतदेह तरी द्या, मंत्री-नेत्यांमुळे बचावकार्यात अडथळा; मुख्यमंत्र्यांसमोर नातेवाईक संतापले

Gold Rate Today : एका आठवड्यात १८०० रुपयांनी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिरातील वाढती गर्दी वादाचे कारण; दर्शन व्यवस्थेच्या अभावामुळे भाविकांना मारहाण

SCROLL FOR NEXT