swt13.jpg
74385
रघुनाथ चव्हाण, गिरीष राऊळ
कुडाळ शिक्षकेतर कर्मचारी
संघटना अध्य़क्षपदी चव्हाण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ः तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी रघुनाथ चव्हाण, कार्यवाहपदी गिरीष राऊळ यांची निवड करण्यात आली. कुडाळ तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा मेळावा अध्यक्ष प्रसाद पडते यांच्या अध्यक्षतेखाली व हिर्लोक हायस्कूलचे सेवानिवृत्त लिपिक बाळकृष्ण मेस्त्री यांच्या निवासस्थानी झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कार्यवाह सुरेंद्र लांबोरे, गजानन नानचे उपस्थित होते. मेळाव्यात सेवानिवृत्त कर्मचारी श्री बाळकृष्ण मेस्त्री, विलास सावंत, सत्यविजय वालावलकर, सुरेश तांबे, प्रमोद सावंत, हनुमंत गोसावी, झिलू सावंत, गणेश होडावडेकर यांचा सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा पतपेढीचे नवनिर्वाचित संचालक सुरेंद्र लांबोरे, उमेश नाईक व कुडाळ तालुकाध्यक्ष रघुनाथ चव्हाण, विलास पालकर यांचाही सत्कार करण्यात आला.
मेळाव्यामध्ये कुडाळ तालुका संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी राजेंद्र सावंत, सचिव प्रफुल्लता सावंत, खजिनदार कौशल कुडतरकर, सदस्य प्रसाद साटम, विलास म्हापणकर, देवेश ठुंबरे, आशिष राठोड, सूर्यकांत बावराणे, नीलेश तवटे, सल्लागारपदी आल्हाद शिरसाट, सुनील नाईक, गोपाळ हरमलकर व उमेश नाईक यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष पडते, प्रमुख पाहुणे लांबोरे, नानचे यांनी संघटनेचे महत्त्व व एकजुटीसंदर्भात मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन उमेश नाईक यांनी केले. आभार रघुनाथ चव्हाण यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.