कोकण

जिल्ह्यातून पंढपूरसाठी २३ एसटी गाड्या आरक्षित

CD

पंढपूरसाठी २३ एसटी गाड्या आरक्षित
उद्या होणार रवाना ; ३० बसच्या नोंदणीची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : लाखो वारकरी, भाविक आषाढी वारीनिमित्त दरवर्षी पंढरपूरला लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. अनेक भाविक, वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. उर्वरित भाविक, वारकरी हे एसटी, रेल्वेने जातात. यासाठी जिल्ह्यातून एसटी विभागानेही गाड्यांचे नियोजन केले आहे. आतापर्यंत २३ एसटी गाड्यांचे आरक्षण झाले आहे. ३ जूनला रत्नागिरीसह विविध आगारातून एसटी बस पंढरपूरला रवाना होणार आहे. अजून काही दिवस असल्याने भाविकांनी जास्तीत जास्त आरक्षण करावे, असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने केले आहे.
आषाढी वारी काहीच दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे काही वारकरी, भाविक उन्ह, वारा, अंगावर पावसाच्या सरी झेलत पायी जाण्यासाठी निघाले आहेत. विठुनामाचा गजर करीत लाखो वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. वारकरी, भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी जिल्ह्यातून आतापर्यंत २२ एसटी बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. अजून काही दिवस शिल्लक असून ३० ते ३५ गाड्या बुकिंग होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ३० एसटी बसेस पंढरपूरला धावल्या होत्या. रत्नागिरीकरांनी पंढरपूरला खासगी बसेस, सायकलवारी करून लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले आहे. उर्वरित भाविकांना पंढरपूरला जायचे असेल तर आताच एसटी आरक्षण करावे, असेही आवाहन करण्यात आले.
---
महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत
आषाढी वारीसाठी एसटी महामंडळाने यंदाही ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत, तर महिला, ६५ वर्षावरील नगारिकांसाठी अर्धे तिकीटे असणार आहे. याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असेही सांगण्यात आले.
---
कोट...
आषाढी एकादशी येत्या ६ जुलै आहे. त्यामुळे लाखो भाविक पंढरपूरला जातात. यंदाच्या वर्षी एसटी विभागाकडून एसटीचे नियोजन केले आहे. आतापर्यंत लांजासह विविध तालुक्यांतून २३ एसटी बसचे बुकिंग झाले आहे. आणखी काही दिवसात एसटी बुकींग होतील. ३ जुलैला रत्नागिरीसह विविध आगारातून एसटी बसेस-पंढरपूरकडे रवाना होतील.
-प्रज्ञेश बोरसे, विभागीय नियंत्रक, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT