कोकण

पकडलेल्या गुरांकडे मालकांची पाठ

CD

‘त्या’ गुरांकडे मालकांची पाठ
राजापूर पालिका ; शुक्रवारनंतर करणार लिलाव
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ : गेल्या काही वर्षापासून राजापूरवासीयांची डोकेदुखी ठरलेल्या मोकाट गुरांच्या समस्येबाबत नागरिकांतून ओरड झाल्यानंतर राजापूर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला. पाच मोकाट गुरांना ताब्यात घेतले. मात्र त्याला आठवडाभराचा कालावधी उलटला तरी गुरांच्या मालकांनी ती सोडवून नेलेली नाहीत. त्यामुळे मालकच जनावरांबाबत बेफिकीर असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
नगरपालिकेशी संपर्क साधून संबंधित गुरांच्या मालकांनी आपली जनावरे सोडवून न्यावीत, अन्यथा ४ जुलैनंतर ताब्यात असलेल्या जनावरांचा कधीही लिलाव करण्यात येईल, असा असा इशारा पालिकेने दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राजापूर शहरात मोकाट जनावरांच्या पश्नाने डोके वर काढले आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी बिनदिक्कत फिरणारी आणि रात्रीच्या वेळी रस्त्यात ठाण मांडून बसणाऱ्‍या जनावरांच्या टोळक्यांमुळे अपघाताचा धोका वाढला होता. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीयांतून होत होती. त्यामुळे पालिकेने गेल्या आठवड्यात फिरणाऱ्या असंख्य गुरांपैकी केवळ पाच मोकाट गुरांना ताब्यात घेतेले आहे. या सर्व गुरांना पालिकेच्या मालकीच्या जीर्ण विश्रामगृहात ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT