कोकण

-लांजातील ३०० खोकेधारकांना नोटिसा

CD

-rat१p६.jpg-
२५N७४४९०
लांजा ः शहरातील महामार्गाशेजारी असणाऱ्या या व्यावसायिकांना प्रशासनाने नोटीसा पाठवल्या आहेत.
----

लांज्यातील ३०० खोकेधारकांना नोटीसा
३ जुलैपर्यंत मुदत ; व्यावसायिकांवर बेकारीची वेळ, पर्यायी जागेची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे लांजा शहरामध्ये काम सुरू आहे. या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून, रस्त्यावरील छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या खोकेधारकांना अनधिकृत ठरवण्यात आले आहे. ३ जुलैपर्यंत व्यवसाय बंद न केल्यास अथवा खोके न हटविल्यास त्यांच्यावर पोलिसांच्या साह्याने दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा नगरपंचायत व तहसील कार्यालयांनी दिल्या आहेत.
शहरातील हे खोकेधारक अन्य कोणत्याही राज्य अथवा जिल्ह्यातून आलेले नसून स्थानिक आहेत. त्याचबरोबर गेले अनेक वर्षे ते छोटा-मोठा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. महामार्गाच्या कामामुळे त्यांचा व्यवसाय अस्थिर झाला आहे. या परिस्थितीत प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे खोकेधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शहरात ३०० खोकेधारक असून उदरनिर्वाहासाठी वडापाव, चहा, कपडे विक्री, भाजीपाला असे व्यवसाय करीत आहेत. त्यांना आता आपला व्यवसाय बंद करावा लागणार आहे. त्यांच्यावर बेकारीची वेळ येणार आहे.
या नोटिशींमुळे भयभीत झालेल्या शहरातील व्यावसायिकांनी तालुकाप्रमुख सुरेश करंबळे यांची भेट घेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेनेने शहरातील खोकेधारकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. प्रशासनाने किंवा नगरपंचायतीने कारवाईची नोटीस देताना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र अशी कोणतीही भूमिका नगरपंचायतीने घेतलेली नाही. सध्या पावसाचे दिवस आहेत. अवघ्या एक ते दीड महिन्यानंतर गणपती सण येत आहे. अशावेळी त्या व्यावसायिकांनी काय करायचे, असा प्रश्न करंबळे यांनी उपस्थित केला. ज्येष्ठ शिवसैनिक नितीन शेट्ये म्हणाले, शहरातील महामार्गालगत अनेक अनधिकृत बांधकामे उभी आहेत, तसेच अनेक इमारतीही उभ्या राहत आहेत. मात्र धनदांडग्यावर कारवाई करण्याची हिंमत प्रशासन करीत नाही. हातावर पोट असलेल्या सर्वसामान्यांवर कारवाई करीत आहे. सर्व खोकेधारकांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे.
---
कोट
नगरपंचायत प्रशासन व लांजा तहसीलदार हे कोणाच्यातरी दबावाला बळी पडून ही कारवाई करीत आहेत. मात्र त्यामुळे सर्वसामान्य व्यावसायिकांचे संसार उघड्यावर पडणार असेल तर शिवसेना सहन करणार नाही.
- अभिजित राजेशशिर्के, तालुका युवा अधिकारी, युवा सेना
-----------
कोट
गेली अनेक वर्षे लांजा शहरात छोटा-मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या खोकेधारकांना अनधिकृत ठरवून प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार असेल तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे कदापि सहन करणार नाही. शासनाच्या या भूमिकेचा तीव्र निषेध करीत असून वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करू.
--सुरेश करंबेळे, तालुकाप्रमुख, शिवसेना
---
कोट ३
लांजा बाजारपेठेतील खोकेधारकांना प्रशासनाने ३ जुलैपर्यंत खोके उचलण्याचे आदेश दिले आहेत. वर्षानुवर्ष हे खोकेधारक या ठिकाणी व्यवसाय करीत असून या व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा.
- नितीन शेटे, व्यावसायिक, लांजा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT