-rat१p९.jpg-
२५N७४५११
रत्नागिरी ः जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंसह अध्यक्ष शशिकांत काळे, अरुण करमरकर, मनोहर केळकर, मंदार खेर, मिलिंद साप्ते, नितीन लिमये, विनय गांगण आदी.
------
रियाज अकबर अलीने पटकाविला दुहेरी मुकुट
जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा ; निधी सप्रे, स्वरा मोहिरे विजयी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः शहरातील टिळक आळी येथील श्री मारूती-गणपती पिंपळपार देवस्थान आयोजित जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या रियाज अकबर अलीने दुहेरी मुकुट पटकाविला.
जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सर्व गटातून सुमारे २६४ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत पुरुष एकेरीत अंतिम सामन्यात रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याने आंतरराष्ट्रीय खेळाडू रियाज अकबर अली विरुद्ध खेळताना पहिला सेट २५-०० असा जिंकून चांगली सुरुवात केली होती. परंतु रियाजने अनुभवाच्या जोरावर पुढील दोन्ही सेट २५-१५, २५-०४ असे जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुरुष दुहेरीतील अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या रियाज अकबर अली-अभिषेक चव्हाण या जोडीने राहुल भस्मे (देवरुख) व मुक्तानंद वरवडेकर (चिपळूण) या जोडीचा ११-५ व १६-०० असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. रत्नागिरी कॅरम स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच राजापूरची निधी सप्रे व रत्नागिरीची स्वरा मोहिरे हे महिला व किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात आमनेसामने होते. महिला गटाचे विजेतेपद स्वरा मोहिरेने तर किशोरी गटाचे विजेतेपद निधी सप्रेने पटकाविले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे, अरुण करमरकर, मनोहर केळकर, मंदार खेर, जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव मिलिंद साप्ते, नितीन लिमये, विनय गांगण, विवेक देसाई, पंच प्रकाश कानिटकर, मंदार दळवी, सागर कुलकर्णी, सचिन बंदरकर यांच्यासह कॅरम खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेत एकमेव ब्लॅक टू फिनिशची नोंद रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाण याने केली. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आनंद भिडे, मनोहर केळकर, मंदार खेर, निखील आंबडेकर, टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.
----
स्पर्धेचा अंतिम निकाल ः
-पुरुष दुहेरी ः रियाज अकबरअली-अभिषेक चव्हाण विजयी विरुद्ध राहुल भस्मे/मुक्तानंद वरवडेकर (११-०५, १६-०० )
- पुरुष एकेरी ः रियाज अकबरअली विजयी विरुद्ध अभिषेक चव्हाण ( ००-२५, २५-१५, २५-०४)
- वयस्कर पुरुष गट एकेरी ः दामोदर घाणेकर विजयी विरुद्ध विश्वनाथ शिवलकर ( २०-१६, १६-०८ )
- महिला गट ः स्वरा मोहिरे विजयी विरुद्ध निधी सप्रे ( २५-१२, १२-२५,२१-२०)
- कुमार गट ः ओम पारकर विजयी विरुद्ध हर्षल पाटील ( २५-००, २५-०४)
- किशोर गट ः वेदांत करगुटकर विजयी विरुद्ध आदित्य देसाई (११-०४,१५-००)
- किशोरी गट ः निधी सप्रे विजयी विरूद्ध स्वरा मोहिरे (२५-१२, १२-२५,१३-०१)
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.