भूगोल प्रश्नमंजूषेत
वरद गोखले प्रथम
सावर्डे : गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेच्या वरद अभय गोखले या सातवीच्या विद्यार्थ्यांने भूगोल प्रश्नमंजूषा स्पर्धेत चिपळूण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. ही स्पर्धा शिरळ येथील विद्याभारती शैक्षणिक संकुलातर्फे राष्ट्रीय भूगोल दिनाच्या निमित्ताने घेण्यात आली. स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्यामध्ये भूगोल विषयाची आवड निर्माण व्हावी भौगोलिक संकल्पना दृढ व्हाव्यात या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना भूगोल शिक्षक सुखदेव म्हस्के, शिक्षिका अपर्णा डिके, सिद्धी सावंत यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण आदींनी अभिनंदन केले आहे.
पाटपन्हाळे विद्यालयात
राजर्षी शाहू जयंती
गुहागर ः तालुक्यातील पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व कवी कालिदास दिन कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका एस. एस. चव्हाण यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थिनी मानसी संदीप पालकर हिने व प्रास्ताविक मृण्मयी दत्ताराम जाधव हिने केले.
माजी विद्यार्थ्यांकडून
तेर्ये शाळेला देणगी
संगमेश्वर ः तेर्ये शाळेला माजी विद्यार्थी सुनील देवजी कापले यांनी शाळेसाठी दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करून समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. आगामी गणेशोत्सवात शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शाळेच्या सुरक्षेत वाढ होणार आहे. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश पवार, राजू बाईत उपस्थित होते. सुनील कापले यांचे शाळेप्रति असलेले प्रेम व सामाजिक भान निश्चितच आहे. त्यांच्या या योगदानामुळे इतर माजी विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा मिळेल, असा विश्वास शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केला.
मानसी तटकरे
पोलिस खात्यात
चिपळूण : तालुक्यातील कामथे येथील बाळासाहेब माटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी मानसी दीपक तटकरे हिची पुणे येथील महाराष्ट्र कारागृह विभागातील पोलिस खात्यात नियुक्ती झाली. याबद्दल विद्यालयाच्या वतीने प्र मुखाध्यापिका सौ. डिंगणकर आणि सर्व शिक्षकांच्या हस्ते मानसीचा यथोचित गौरव करण्यात आला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.