कोकण

देवगडातील वीज खांबांनी अखेर घेतला मोकळा श्वास

CD

सकाळ इम्पॅक्ट

swt143.jpg
N74673
जामसंडे ः येथील विद्युत खांबाने अखेर मोकळा श्‍वास घेतला. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

देवगडातील वीज खांबांनी
अखेर घेतला मोकळा श्वास
‘सकाळ’च्या वृत्ताची दखल ः महावितरणची कार्यवाही
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १ ः ‘सकाळ’च्या बातमीच्या दणक्यानंतर येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली. तातडीने शहरातील विद्युत खांबावरील वेली काढण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे गुदमरलेल्या खांबानी अखेर मोकळा श्‍वास घेतला. यातून पथदीपांचा प्रकाश व्यवस्थित खाली पडू लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
येथील शहरातील विविध भागातील विद्युत खांबावर वेली चढत असल्याने धोकादायक बनले होते. रात्रीच्यावेळी काही खांबावरील पथदीपांचा प्रकाशही यामुळे पूर्ण क्षमतेने खाली पडत नव्हता. विद्युतभारित लोखंडी खांबावर वेली असल्याने तसेच खांब लोखंडी असल्याने खाली विजेचा धक्का बसण्याची शक्यताही वर्तवली जात होती. विविध भागात पावसामुळे झाडी वाढली आहे. रस्त्याकडेला असलेल्या विद्युत खांबावर वेली चढून खांबाला पूर्णपणे वेढले असल्याचे काही भागात चित्र होते. यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात होती. याबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांना सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर या समस्येकडे ''सकाळ''ने लक्ष वेधून वृत्त प्रसिध्द केले होते. याची तातडीने दखल घेऊन आज धोकादायक असलेल्या विद्युत खांबावरील वेली हटवण्याचे काम सुरू झाले. अधिक प्रमाणात वेली असलेल्या खांबावरील वेली हटवून खांब मोकळे करण्यात आले. यामुळे रात्रीच्यावेळी पथदीपांचा प्रकाश स्पष्टपणे खाली पडू लागला होता. वस्तीमध्ये असलेल्या खांबावरील वेली हटवल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. दरम्यान, शहरातील काही भागात असलेल्या समस्या दूर करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT