कोकण

रुग्णवाहिका चालकांच्या प्रश्नांना फुटली वाचा

CD

रुग्णवाहिका चालकांच्या प्रश्नांना फुटली वाचा
अल्प मानधन : पालकमंत्र्यांनी घेतली दखल
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २ः आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सेवा देणाऱ्या व बारा तास काम करणाऱ्या टोल फ्री १०८ रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न त्यांच्या आंदोलनामुळे समोर आले आहेत. अल्प मानधनावर काम करणाऱ्या या रुग्णवाहिका चालकांनी वाढीव मानधन व अन्य प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी भवनासमोर आंदोलन छेडले. मंत्री नीतेश राणे यांनी या आंदोलनाची तत्काळ दखल घेतली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. या प्रश्नाबाबत बैठक घेऊन तोडगा काढू व या चालकांचे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही मंत्री राणे यांनी दिली. त्यानंतर हे उपोषण आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले.
बारा तास ड्यूटी करून देखील अल्पमानधावर काम करावे लागत असल्याने जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका चालक संघटना आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा दिला होता. संघटनेचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. यावेळी जिल्ह्यातील सर्व १०८ रुग्णवहिका चालक या आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे जिल्ह्यातील १०८ रुग्णसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.
हे आंदोलन केवळ सेवा पुरवठादार कंपनीच्या विरोधात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१४ पासून १०८ रुग्णवाहिका चालक प्रामाणिकपणे रुग्णसेवा देत आहे; परंतु सेवा पुरवठा कंपनीकडून अपेक्षित वेतन मिळत नाही. या विरोधात कित्येक वेळा आंदोलने झाली; परंतु कंपनीने केवळ आश्वासने दिली आहेत. त्यामुळे कंपनी विरोधात १०८ चालकांमध्ये तीव्र असंतोष आहे. रुग्णवाहिकांची अवस्था सुद्धा बिकट आहे.
१०८ रुग्णवाहिका चालकांना समान काम, समान वेतन तत्वावर वेतन मिळावे, चालकाची ड्युटी बारा तासावरून आठ तास करण्यात यावी. सर्व प्रकारचे भत्ते लागू व्हावेत, अशी प्रमुख मागणी आहे. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पालकमंत्री राणे यांनी त्यांच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तूर्तास हे आंदोलन काही दिवस थांबविण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास ५ जुलैपासून पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचे संघटना अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

Indias Most Richest and Poorest CM: भारतातील सर्वात श्रीमंत अन् सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? ‘ADR’ रिपोर्टमधून झाले उघड!

SCROLL FOR NEXT