कोकण

पुंडलिक वरदा

CD

संतांचे संगती-----------लोगो
(२६ जून टुडे ३)

पंढरपूरचे श्री विठ्ठल या क्षेत्री का आले? याचे उत्तर ‘पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गां’ या विष्णुदास नामारचित श्री विठ्ठलाच्या आरतीमधील ओळीत दिलेले दिसते. अर्थात् भक्तश्रेष्ठ पुंडलिकासाठी भगवान श्री पांडुरंग पंढरीत आले. आज आपण या पुंडलिकाची कथा पाहूया.
- rat२p९.jpg-
25N74690
- धनंजय चितळे
-----
पुंडलिक वरदा....
पुंडलिक हा आपल्या आई-वडिलांसमवेत पंढरपुरात राहत होता. वयोमानानुसार त्याचा विवाह झाला आणि तो पत्नीप्रेमात अखंड बुडाला. त्याला त्याची पत्नी हेच सर्वस्व वाटू लागले. तो आपल्या माता-पित्यांकडेही दुर्लक्ष करू लागला. त्यांना आपल्या पत्नीची सेवा करण्यास सांगू लागला. काही वर्षांनंतर पुंडलिकाच्या पत्नीला तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली. पत्नीचे सर्व हट्ट पुरवणाऱ्या पुंडलिकाने यात्रेची तयारी केली. सामान उचलणे, जेवण करणे इत्यादी कामांसाठी आई-बाबांनाही त्याने बरोबर घेतले. मजल दरमजल करत हे सर्वजण कुक्कुट ऋषींच्या आश्रमात आले. तिथे त्यांनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पहाटेच्यावेळी आश्रमाचा परिसर कोणीतरी झाडत आहे याची जाणीव पुंडलिकाला झाली. इतक्या लवकर हे काम कोण करत आहे याची उत्सुकता वाटून पुंडलिक बाहेर आला. त्याने पाहिले तर पांढरे; पण मलीन असणारे वस्त्र नेसलेल्या तीन स्त्रिया आश्रम परिसर झाडत होत्या. आश्चर्य म्हणजे जसजसा आश्रम स्वच्छ होत होता तसतशी त्या स्त्रियांच्या अंगावरील वस्त्रेही स्वच्छ होत होती. पुंडलिकाला ते विशेष वाटले आणि त्याने त्या स्त्रियांना आदरपूर्वक नमस्कार करून विचारले आपण कोण? आणि आपण आश्रम का झाडत आहात? त्यावर त्या स्त्रिया म्हणाल्या, ‘आम्ही गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्या आहोत. रोज अनेक लोकं आमच्यामध्ये स्नान करतात. त्यामुळे आम्ही मलीन होतो पण; कुक्कुट ऋषी महापुण्यवान असल्याने येथे सेवा केली की, आम्ही पुन्हा पूर्ववत स्वच्छ होतो.’ पुंडलिकाने विचारले, ऋषींनी असे कोणते पुण्य कर्म केले आहे? त्यावर या तीन श्रेष्ठ नद्या म्हणाल्या, कुक्कुट ऋषींनी तीर्थयात्रा केली नाही. त्यांनी इतर कोणते साधन केले नाही, तपाचरण केले नाही तर ते केवळ आपल्या माता-पित्यांची अखंड सेवा करत आहेत. हे ऐकल्याबरोबर पुंडलिकाला आपली चूक कळून आली. तोच त्यांच्या आयुष्यातील कलाटणी देणारा क्षण ठरला. आता त्यांच्या वर्तनात आमुलाग्र बदल झाला आणि तो माता-पित्यांच्या सेवेमध्ये इतका मग्न झाला की, स्वतः भगवंत दरवाज्यात आल्यानंतरही त्याने भगवंतांना विटेवर उभे केले; पण सेवा सोडली नाही म्हणूनच भगवान श्री विठ्ठलाचा नामगजर करताना या महापुण्यवान पुंडलिकाचे प्रथम स्मरण केले जाते, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.

(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT