कोकण

राज्यस्तरावरील पहिले पारितोषिक

CD

- rat२p१०.jpg-
२५N७४६८६
जळगाव ः राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना प्राचार्य राजेंद्र वारे, पर्यवेक्षक उद्धव तोडकर व शिक्षक.
---
निकम विद्यालयाला लाखाचे पहिले पारितोषिक
राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धा; सलग तिसऱ्या वर्षी यश
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २ ः जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे २०२४-२५ शैक्षणिक वर्षात राबवलेल्या गांधीतीर्थ स्वच्छ शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरावरील एक लाख रुपयांचे पहिले पारितोषिक पटकावले.
महात्मा गांधीजी यांचे स्वच्छतेविषयीचे विचार समाजात रुजले जावेत यासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण नुकतेच जळगाव येथील कस्तुरबा गांधी सभागृहात झाले. या प्रसंगी पुणे येथील सागरमित्र अभियानाची सहसंस्थापक विनोद बोधनकर, शिक्षण विभागाच्या राज्य सल्लागार परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे, जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अशोक जैन, अंबिका जैन, गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
राज्यातून चौदाशे विद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. सावर्डे या विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र. १ मध्ये विभागात दुसरा क्रमांक प्राप्त केला होता तर टप्पा क्र. २ मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे तसेच आता राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी एक लाखाचे पारितोषिक मिळवले. विद्यालयाने सातत्यपूर्ण कामगिरी करून या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, गांधीतीर्थ स्वच्छ शाळा समन्वयक जयंत काकडे, संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे अध्यक्ष शांताराम खानविलकर, सचिव महेश महाडीक आदींनी विद्यालयाचे कौतुक केले आहे.

स्वच्छतेविषयक राबवलेले उपक्रम
सावर्डे विद्यालयाने प्लास्टिकमुक्ती शाळा, स्वच्छता, परिसर स्वच्छता, ग्रामस्वच्छता, वैकुंठभूमी स्वच्छता, पाणवठा स्वच्छता, प्लास्टिकचा पुनर्वापर अथवा त्याची योग्य विल्हेवाट या उपक्रमावर वर्षभर अतिशय परिणामकारक काम करून समाजजागृती करण्यासाठी विशेष भर दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT