-rat२p२४.jpg-
२५N७४७४६
लांजा ः तालुक्यातील पुनस परिसरात लावणीचे काम वेगाने सुरू आहे.
-----
अनियमित पावसामुळे भातलावणी कूर्मगतीने
जिल्ह्यात ३५ टक्केच लागवड; रोपांची रूजवात न झाल्याने पुनर्लागवडीत अडथळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः जिल्ह्यातील भात व नाचणी पिकाचे लक्षांक ५२ हजार ५२२ हेक्टर असून, आतापर्यंत १५ हजार १६५ हेक्टर क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे. यावर्षी पावसाचे वेळापत्रक अनियमित राहिल्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात ५० टक्के भातलावण्या पूर्ण होणे अपेक्षित असतानाच हा टक्का ३५ वरच अडकला आहे. यावर्षी लावण्यांची कामे पूर्ण होण्यास दहा दिवसांचा विलंब होईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यावर्षी रोपांची रूजवात व्यवस्थित न झाल्यामुळे पुनर्लागवडीचे लक्ष्य पूर्ण करण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान आहे; मात्र याची कृषी विभागाकडून अधिकाऱ्यांकडे नोंदच नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यावर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सलग दहा दिवस पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला. अचानक आलेल्या या पावसाचा परिणाम भातशेतीवर झाला आहे. खरीपपूर्व कामे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात केली जातात. पेरणी करण्यात येणाऱ्या शेतमळ्यांची साफसफाई करणे, पुनर्लागवड करणाऱ्या जागांची सफाई करणे ही कामे केली जातात. काही ठिकाणी शेणखत टाकून ठेवले जाते. त्यामुळे पाऊस पडला की, शेतामध्ये गवत उगवत नाही; परंतु ही कामे करण्यास शेतकऱ्यांना वेळ मिळालेला नाही. त्यामुळे गवत मोठ्या प्रमाणात रूजून आले असून, त्याची साफसफाई करण्यासाठीच शेतकऱ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागली. मजूर मिळवणे हे शेतकऱ्यांपुढील मोठे आव्हान आहे. या परिस्थितीवर मात करत अनेकांनी रोपवाटिकांसाठी पेरण्या केल्या आहेत. त्यातही ८६ टक्केचे पेरण्या झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. लवकर पडलेल्या पावसाचा हा परिणाम असून, १४ टक्के शेतकऱ्यांनी रोऊ पेरल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात १ जून ते १ जुलै या कालावधीत ९५२ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तेवढाच पाऊस झाला आहे; परंतु यामध्ये अनियमितता अधिक आहे. काही महसुली मंडळात अधिक तर काही ठिकाणी कमी पावसाची नोंद झालेली आहे. त्याचा परिणाम भात लागवडीवर होत आहे. कातळावरील भातपेरण्या विलंबाने झालेल्या आहेत. जिल्ह्यात असे क्षेत्र सुमारे १० हजार हेक्टर इतके आहे. जिथे पाणी आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी भातलावण्यांना सुरुवात केलेली आहे; परंतु तिथेही रोपांची व्यवस्थित रूजवात झालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांपुढे रोपं पुनर्लागवडीसाठी पुरतील की, नाही असा मोठा प्रश्न आहे. सध्या जिल्ह्यात अधुनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे पुनर्लागवडीचा वेग मंदावला आहे. काही ठिकाणी रोपांची चांगली वाढ होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात सरासरी ५२ हजार हेक्टरवर खरीपातील लागवड होते. आतापर्यंत १५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. पुढील आठ दिवसात अधिकाधिक क्षेत्रावर लागवड होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
---
कोट
यंदा २० मे रोजी अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतीची मशागतीची कामे करण्यास एक आठवडा विलंब झाला होता. त्यामुळे भातपिकाची पेरणी एक आठवडा लांबली. पाऊस ठराविक भागात पडत होता. तो सर्वदूर नसल्यामुळे काही भागांमध्ये सर्वसाधारणपणे पाच ते आठ दिवस पेरण्यांना विलंब झाला. पुढील आठवड्यात अधिकाधिक भात पुनर्लागवड होईल.
- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
---
भात पुनर्लागवडीची तालुकानिहाय आकडेवारी
तालुका* पुनर्लागवडीचे क्षेत्र (हेक्टरी)
दापोली* ७२५
मंडणगड* ४५०
खेड* ४८०
गुहागर* ७११
चिपळूण* १०००
संगमेश्वर* ४०१०
रत्नागिरी* ४५१०
लांजा* ८२२
राजापूर* २४५६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.