कोकण

रेल्वेमुख्य जनसंपर्क अधिकारीपदी नारकर

CD

-rat२p१.jpg-
२५N७४६८०
सुनील नारकर
--------
रेल्वे​मुख्य जनसंपर्क
अधिकारीपदी नारकर
रत्नागिरी : सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. नारकर हे १९९७ पासून कोकण रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. कोकण रेल्वेमधील त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची आणि जबाबदारीची पदे भूषवली आहेत. रत्नागिरी येथे प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (आरटीएम) आणि मडगाव येथे वरिष्ठ प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (सीनियर आरटीएम) या पदांच्या जबाबदाऱ्या यापूर्वी त्यांच्याकडे होत्या. बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक (उपाध्यक्ष सीसीएम) पदाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक
तालुकाध्यपदी काझी
सावर्डे ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) अल्पसंख्यांक सेल (विभाग) चिपळूण तालुकाध्यक्षपदी समीर काझी यांची फेरनिवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी ही निवड जाहीर केली. गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत समीर काझी यांनी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले तसेच ते सुरवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी एकसंघ आहेत. पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि सामाजिक कार्य याची दखल घेत निकम व जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या शिफारशीने समीर काझी यांची फेरनिवड करण्यात आली.

‘सोनवडे’ आज
पारितोषिक वितरण
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे विद्यालयात गुरूवारी (ता. ३) दुपारी २.३० वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. समारंभाला प्रा. डॉ. हेमंत चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या समारंभामध्ये दहावी परीक्षेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना तसेच पाचवी ते नववीतील प्रथम तीन क्रमांकासह गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना बक्षिसे, आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी बंडगर यांनी दिली आहे.

ब्राह्मण सहाय्यक
संघाकडून शिष्यवृत्ती
चिपळूण ः ब्राह्मण सहाय्यक संघाकडून चिपळूण शहर आणि परिसरातील ब्राह्मणज्ञातीतील पाचवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षीही ती दिली जाणार आहे. जे विद्यार्थी ही शिष्यवृत्ती ही घेऊ इच्छितात त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी ५ ते १० जुलै या काळात सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत चिपळूणच्या ब्राह्मण संघाच्या कार्यालयात येऊन शिष्यवृत्ती अर्ज घेऊन जावेत. पूर्ण भरलेले अर्ज १५ ते ३० जुलै या काळात संघाच्या कार्यालयात आणून द्यावेत. विद्यार्थी ज्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेत असेल त्या संस्थेच्या प्रमुखाची सही असणे आवश्यक आहे. प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली असावी, असे ब्राह्मण सहाय्यक संघाने कळवले आहे.

पाग विद्यालयात
वृक्षदिंडी, वृक्षारोपण
चिपळूण ः कृषिदिनाचे औचित्य साधून चिपळूण पालिका व पाग न्यू इंग्लिश स्कूल पाग व पूर्ण प्राथमिक मराठी शाळेतर्फे पाग परिसरात कृषिदिन साजरा करण्यात आला. पाग परिसरामध्ये वृक्षदिंडी काढण्यात आली. पालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर, आरोग्य विभागप्रमुख सुजित जाधव यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर पाग परिसरामध्ये वृक्षदिंडी काढण्यात आली. पाग शाळेजवळ वृक्षारोपण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT