swt218.jpg
74801
सावंतवाडी ः उपअभियंता शैलेश राक्षे यांना निवेदन देताना सरपंच गुणाजी गावडे व वेत्ये ग्रामस्थ.
वीज समस्येमुळे वेत्येवासीय आक्रमक
सावंतवाडीत अधिकाऱ्यांना जाबः तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ः वेत्ये गावातील विजेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विविध कंपन्यांकडून होणारा विलंब आणि त्यामुळे गावातील ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेता सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधींनी वीज वितरणचे सावंतवाडी उपअभियंता शैलेश राक्षे यांना जाब विचारला. गावातील वीजप्रश्न तत्काळ मार्गी लावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावेळी उद्यापासून (ता. ३) गावातील विद्युत कामे हाती घेण्यात येणार असल्याचे आश्वासन उपअभियंता राक्षे यांनी दिले.
तालुक्यातील वेत्ये गावामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच विजेच्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. या संदर्भात सरपंच गावडे तसेच ग्रामस्थांकडून विविध वितरणच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना कल्पना देऊनही या समस्या सोडविण्याबाबत दुर्लक्ष केला जात होता. याचा फटका गावातील ग्रामस्थांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागत होता. वीज वितरणचा हलगर्जीपणा आणि कामचुकारपणा लक्षात घेता आज सरपंच गावडे यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी उपअभियंता राक्षे यांच्या कार्यालयात धडक देत त्यांना जाब विचारला. वारंवार कल्पना देऊनही गावातील विजेच्या समस्या सोडविण्याकडे टाळाटाळ का केली जाते? असा प्रश्न सरपंच गावडे यांनी केला.
गावामध्ये विद्युत वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्यामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. बऱ्याच ठिकाणी विद्युत खांब जीर्ण होऊन ते धोकादायक बनले आहेत. गावातून जाणारे अकरा केव्ही विद्युत वाहिनी खाली आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही वाहिनी तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी. गावामध्ये ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारची कल्पना न देता स्मार्ट मीटर बसविले आहेत.
याबाबत ग्रामपंचायत प्रशासनालाही कुठलीही माहिती नाही. हा प्रकार चुकीचा असून ज्यांना स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचे विद्युत बिल देण्यात आलेले नाही. त्यामुळे भविष्यात वाढीव लाईट बिल आल्यास आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. यासंदर्भात तोडगा काढावा किंवा स्मार्ट मीटर तत्काळ काढून टाकावे, असे मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली.
ग्रामस्थांची आक्रमकता लक्षात घेता उपअभियंता राक्षे यांनी वेत्ये गावातील वीज समस्या सोडविण्यासाठी उद्यापासूनच कर्मचाऱ्यांना सूचना देऊन सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी राजेंद्र आंबेकर, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुदास गावकर, नरेंद्र मिठबावकर, जितेंद्र गावकर, पुंडलिक देऊलकर, अंतोन फर्नांडिस, शेखर खांबल, बाबू देऊलकर, सत्यवान गावडे, भूषण पाटकर, राम पेडणेकर, संदीप गावडे, अंकुश गावडे, अनंत गोठोसकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.