कोकण

मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीत ग्रामस्थांना डस्टबिनचे वाटप

CD

swt237.jpg
74906
मळेवाडः डस्टबिनचे वाटप करताना सरपंच मिलन पार्सेकर. बाजूला उपसरपंच हेमंत मराठे व इतर मान्यवर. (छायाचित्र ः धनश्री मराठे)

मळेवाड कोंडुरेमध्ये डस्टबिनचे वाटप
मळेवाडः मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीतर्फे गावातील कुटुंबांकरिता सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते डस्टबिनचे वाटप करण्यात आले. ‘स्वच्छतेकडून समृद्धीकडे’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोगांमधून स्वच्छतेकरिता ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी गावातील कुटुंबांना सुका कचरा व ओला कचरा याकरिता प्रत्येकी एक डस्टबिन ग्रामपंचायतीकडून वाटप करण्यात येत आहेत. या वाटपाचा प्रारंभ सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष ग्रामसभेत करण्यात आला. यावेळी उपसरपंच हेमंत मराठे यांनी या डस्टबिनचा गावातील ग्रामस्थांनी योग्य वापर करून कचरा उघड्यावर न टाकता त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट करून गाव स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. महेश शिरसाट, सानिका शेवडे, गिरिजा मुळीक, मधुकर जाधव, दिगंबर मसुरकर, राजाराम मुळीक, दर्शना शिरसाट उपस्थित होते. या ग्रामसभेचे सचिव म्हणून राणी पार्वतीदेवी विद्यालय मळेवाड केंद्रशाळा क्र. १ च्या मुख्याध्यापिका वेंगुर्लेकर यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT