अरुण प्रभू यांच्या आयर्लंडमधील
रेस्टॉरंटला कलाकारांची भेट
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३ : आयर्लंडमध्ये यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले खेड येथील अरुण प्रभू यांच्या आयर्लंड येथील ‘स्पाइस इंडिया’ या रेस्टॉरंटच्या पहिल्या शाखेला मराठी रंगभूमीवरील कलाकार डॉ. गिरीश ओक, अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे, नाटकाचे दिग्दर्शक विजय केंद्रे आणि निर्माता हर्षवर्धन सोमण यांनी भेट दिली.
आयर्लंडमध्ये प्रथमच मराठी व्यावसायिक नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. डॉ. ओक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या या नाटकाने मराठी भाषिक प्रेक्षकांची मने जिंकली. ही घटना आयर्लंडमध्ये मराठी रंगभूमीच्या अस्तित्वासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरली आहे. खेडच्या सुपुत्राने परदेशात मराठी संस्कृतीचा झेंडा अभिमानाने फडकवला असून, हे यश सर्व खेडकरांसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.