परीट समाजसंस्थेच्या
जिल्हाध्यक्षपदी कदम
चिपळूण : संत गाडगेबाबा परीट समाजसंस्थेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सुभाष कदम व कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक मनोज शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या संघटनेची जिल्हा वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पेठमाप परीट आळी विठ्ठल मंदिरात संस्थेचे अध्यक्ष दीपक कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी नवनिर्वाचित कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये उपाध्यक्ष वसंत पिंपळकर, उपाध्यक्ष सुयोग घाग, सचिव नवनीत भोसले, सहसचिव दिनेश कदम, कोषाध्यक्ष रवींद्र भोसले, संघटक दुर्गेश्वर रोकडे, संघटक नथुराम जांभूळकर तर सदस्य सुरेश कदम, रमेश महाडिक, रमाकांत पाटेकर, रवींद्र दुर्गावले, प्रकाश केळसकर, नरेंद्र दुर्गावले, रितेश महाडिक, शिवराज शिंदे, महिला सदस्या आरती शिंदे, वैशाली कदम यांची निवड करण्यात आली. सल्लागार दत्ताराम महाडिक, हसमुख पांगारकर, संतोष कदम, दीपक कदम, श्रीकृष्ण शिंदे, अशोक जांभुळकर, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस हे काम पाहणार आहेत. लाँड्री संघटना जिल्हाध्यक्ष महेश भोसले, महिला संघटना अध्यक्ष अंजली पिंपळकर, कार्याध्यक्ष वैशाली शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष नितीन चाळके, युवक कार्याध्यक्ष संदेश कदम यांची निवड जाहीर करण्यात आली. चिपळूण-गुहागर तालुकाध्यक्ष अजित पावसकर, दापोली-मंडणगड तालुकाध्यक्ष प्रथमेश दुर्गावले, लांजा-राजापूर तालुकाध्यक्ष विजयराव कदम, संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र कदम, खेड तालुकाध्यक्ष अशोक जांभूळकर हे पदसिद्ध सदस्य आहेत.
‘लेखापाल क्षेत्रात
विद्यार्थ्यांना संधी’
सावर्डे ः लेखापाल ही केवळ एक पदवी नसून ती एक जबाबदारी आहे, जी समाजाच्या आर्थिक आरोग्याची निगा राखते. अशा लेखापाल (चार्टर अकाउंटंट) च्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना आजच्या युगात करिअरच्या संधी आजमावता येतील, असे प्रतिपादन अॅड. प्रसाद कदम यांनी केले. सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या सावर्डे येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील कॉमर्स विभागाअंतर्गत आयोजित ''नॅशनल चार्टर अकाउंटंट डे'' निमित्त ते बोलत होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य टी. वाय. कांबळे यांनी कदम यांचे स्वागत केले.
rat३p३७.jpg-
२५N७५११४
डॉ. अनिल पावसे
फिशरिज कॉलेजच्या
अधिष्ठातापदी डॉ. पावसे
गावतळे ः डॉ. अनिल पावसे हे दापोली तालुक्यातील बुरोंडी या समुद्रकिनारी वसलेल्या मच्छीमार कोळी समाजातील आदर्श व्यक्तीमत्व. लहानपणापासून अभ्यासाची आवड व नेहमी उच्चशिक्षित होऊन अधिकारीपदावर बसण्याचे वेड घेऊन आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेले डॉ. पावसे आजमितीस कॉलेज ऑफ फिशरिज, रत्नागिरी येथे उच्चस्थानी विराजमान झालेले दिसून येत आहेत. वडील कै. सावळाराम पावसे हे भारतीय सैन्यदलात कार्यरत असताना आईने केलेले संस्कार व लावलेली अभ्यासाची गोडी आज पावसे यांच्या कर्तृत्वाने दिसून आली. त्यांची कॉलेज ऑफ फिशरिज ( मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी ) अधिष्ठातापदी नेमणूक झाली आहे. देशातील अग्रगण्य संस्थेत मच्छीमार कोळी समाजातील व्यक्तीने अतिउच्चपद भूषवणे हे समाजातील तरुणवर्गाला आदर्शवत व प्रेरणादायी आहे. पावसे यांच्या डीन पदी झालेल्या नियुक्तीमुळे संपूर्ण बुरोंडी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.