कोकण

सहकार पुरस्कारसाठी १८ पर्यंत नामांकन द्या

CD

- rat४p१.jpg-
२५N७५१८८
रत्नागिरी ः सहकारी संस्थांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. सोपान शिंदे.
---
सहकार पुरस्कारसाठी १८ पर्यंत प्रस्ताव द्या
डॉ. सोपान शिंदे ः सहकार चळवळीसाठी वेगळा विभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः काश्मीर ते कन्याकुमारी देशभरात सहकार चळवळ बांधण्यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकारिता मंत्रालयाची स्थापना केली. सहकार पुरस्कारसाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त प्रस्ताव १८ जुलैपर्यंत दाखल व्हावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. ही कार्यशाळा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात काल (ता. ३) झाली. जिल्हा उपनिबंधक शिंदे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विकास संस्था, फेडरेशन ग्रुप यांच्या समुहावर सर्व निकष, विविध माहिती दिली जाते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त गावातून सहकार पुरस्कारसाठी प्रस्ताव यावेत, अशी अपेक्षा आहे. १८ जुलैपर्यंत हे प्रस्ताव येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
या प्रसंगी आदर्श लेखा परिक्षण या विषयावर जिल्हा विशेष लेखा परीक्षक विनोद अंडुस्कर यांनी मार्गदर्शन केले. आदर्श संचालक मंडळ सभा विषयावर स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. उत्तम पद्धतीने आपापली संस्था मार्गस्थ व्हावीत. व्यवहार स्वच्छ राहावेत. ज्या उद्देशाने संस्था स्थापन केली तो सफल व्हावा यासाठी संचालक मंडळांची सभा ही महत्त्वाची असते, असे सांगितले. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले. शासकीय लेखा परीक्षक महेश जाधव यांनी आदर्श लेखा परिक्षण, सहाय्यक निबंधक साहेबराव पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण आणि कोमसापचे गजानन पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT