कोकण

शेतकऱ्यांना आज खैराच्या रोपांचे वाटप

CD

चिपळुणात आज खैराच्या रोपांचे वाटप
गिरिजा देसाई ः पालकमंत्री डॉ. उदय सामंतांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार असून, या उपक्रमाचे उद्‍घाटन उद्या (ता. ५) सकाळी १० ते ११.३० या वेळेत चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय वनाधिकारी रणजीत गायकवाड आणि विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी दिली.
चिपळूण येथे होणाऱ्या या कार्यक्रमात वन वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावरही जनजागृतीपर सत्र घेतले जाणार असून, वनसंवर्धनाच्यादृष्टीने नागरिकांचा व शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम आणि आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे उपस्थित राहणार आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ला; भारतीयांच्या मृत्यूने तणाव वाढला, केंद्र सरकारचा इशारा

Nagpur Bench Verdict : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांनाही समान हक्क; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Indian crew killed in Hormuz attack : इराणचा होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजावर हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू तर एक बेपत्ता

T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ

Sangola Political: सांगोला तालुक्यात राजकीय भूकंप! साळुंखे-पाटलांचे पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक..

SCROLL FOR NEXT