कोकण

गुडघाभर चिखलात ‘बांधावरची शाळा’

CD

75219

गुडघाभर चिखलात ‘बांधावरची शाळा’

खारेपाटण शाळेच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ४ ः राज्यातील मॉडेल स्कूल म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण क्रमांक १ या शाळेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कुरंगवणे (ता.कणकवली) या गावी शासनाच्या ‘बांधावरची शाळा’ या उपक्रमाअंतर्गत येथील प्रगतशील शेतकरी नीलेश ब्रह्मदंडे यांच्या भात शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन भात लावणी कामाचा अनुभव घेतला.
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शेतीबाबत आवड निर्माण व्हावी, शेतीची प्राथमिक माहिती त्यांना मिळावी या हेतूने खारेपाटण केंद्र शाळा क्रमांक १ शालेय विद्यार्थ्यांनी ‘एक दिवस बळीराजासाठी’ अर्थात ‘बांधावरची शाळा’ हा उपक्रम खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. प्राप्ती कट्टी, शाळेचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे, उपशिक्षिका सौ. समिधा राऊत व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्रावणकर यांनी विद्यार्थ्यांना कोकणातील शेतकरी भातशेती करताना वापरत असलेल्या पारंपरिक शेती अवजारांविषयी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - नाना पटोले

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT