कोकण

मालवण चर्मकार समाज अध्यक्षपदी भिलवडकर

CD

75258

मालवण चर्मकार समाज
अध्यक्षपदी भिलवडकर

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ : चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा मालवण शहराध्यक्षपदी संजय भिलवडकर यांची तर मालवण प्रभाग अध्यक्ष म्हणून गणेश पाडगावकर आणि मालवण प्रभाग सचिव म्हणून देवेंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा मालवण मालवण तालुका कार्यकारिणीची सभा नुकतीच चंद्रकांत माणगावकर यांच्या घरी मालवण येथील संत रविदास नगर येथे झाली. यावेळी नविन प्रभाग कमिटी स्थापन करण्यात आली. मालवण प्रभाग अध्यक्ष म्हणून गणेश पाडगावकर, मालवण प्रभाग सचिव म्हणून देवेंद्र चव्हाण यांची सर्वानुमते निवड केली. तर मालवण शहराध्यक्षपदी संजय भिलवडकर, शहर उपाध्यक्षपदी पद्माकर माणगावकर व शहर सचिवपदी सोहम आडवलकर यांची निवड झाली.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती आणि समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम व समाजातील निवृत्त अधिकारी, प्रमोशन व विविध संस्थांवर निवड झाल्याबद्दल समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार ओम साई मंगल कार्यालय (मामा माडये) हॉल कट्टा येथे रविवारी (ता.६) साजरा करण्याचे तसेच सभेस प्रमुख वक्ते म्हणून श्री प्रसाद नारायण मसुरकर (इतिहास प्राध्यापक) माध्यमिक विद्यामंदिर कनेडी यांचे नाव तालुकाध्यक्षानी सुचविले. त्यास सर्वांनी मान्यता दिली. मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तालुकाध्यक्ष हरेश चव्हाण यांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या प्रभाग अध्यक्ष गणेश पाडगावकर व प्रभाग सचिव देवेंद्र चव्हाण सदस्य व सल्लागारांतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सल्लागार सुधाकर माणगावकर, दीपक भिलवडकर, सदस्य नीलेश माणगावकर, चंद्रकांत माणगावकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT