rat4p11.jpg-
75211
रत्नागिरी : आषाढीवारीविषयी गुरूवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना अॅड. रूची महाजनी. डावीकडून नंदू चव्हाण, कौस्तुभ सावंत, विराज चव्हाण.
---------
आषाढीवारीमध्ये सहभागी होणार विठ्ठलभक्त
रविवारी एकादशी; सकल हिंदू समाजातर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आषाढी एकादशीनिमित्त येत्या रविवारी (ता. ६) आषाढी वारीचे आयोजन केले आहे. यामध्ये जवळपास चार हजार सकल हिंदू बंधू-भगिनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. वारीमध्ये टाळ-मृदंगाचा गजर करण्यात येणार असून, माळनाका शासकीय विश्रामगृहासमोर व जयस्तंभ येथे गोल रिंगण करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
हॉटेल व्यंकटेश येथे झालेल्या पत्रकार परिषदेला अॅड. रूची महाजनी, कौस्तुभ सावंत, नंदू चव्हाण आणि विराज चव्हाण, सुहास ठाकुरदेसाई आदी उपस्थित होते. ज्या विठ्ठलभक्ताना पंढरपूरपर्यंत वारीला जात येत नाही त्यांची सेवा विठ्ठलचरणी रूजू व्हावी, या हेतूने गेली तीन वर्षे शक्तीमंदिर ते भक्तीमंदिर या संकल्पनेने आषाढीवारीचे आयोजन केले जात आहे. यंदा वारीचे चौथे वर्ष आहे. शक्तीमंदिर म्हणजेच रत्नागिरीमधील मारूती मंदिर तर भक्तीमंदिर म्हणजेच प्रतिपंढरपूर समजले जाणारे रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिर होय.
वारीची सुरवात ६ जुलैला सकाळी ६.३० वाजता मारूती मंदिर येथून होईल. यामध्ये मारूती मंदिरात पूजा, माऊलींच्या पालखीची पूजा करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून वारीला सुरवात होईल. साधारण ९.३० वाजता विठ्ठल मंदिर येथे सांगता होईल. या वारीदरम्यान विठ्ठलभक्तांना रिंगणाचा आनंददेखील घेता येईल. दरवर्षीप्रमाणे अॅड. शिवप्रसाद महाजनी फाउंडेशनतर्फे सर्व वारकऱ्यांना केळी व चिक्कीचे वाटप आणि विठ्ठल मंदिरात प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
साधारण अडीच किलोमीटरचा वारीचा मार्ग सर्वांना पायी चालता येण्यासारखा असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सामील होतील. विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद-भ्रम अमंगळ या उक्तीप्रमाणे जास्तीत जास्त विठ्ठलभक्तांनी या वारीमध्ये पारंपरिक वेषात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाला या वेळी करण्यात आले.
चौकट १
विठ्ठल मूर्ती, तुळशीवृंदावन
माळनाका येथे श्री विठ्ठलाची विराट मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे तसेच दोन महिन्यांपूर्वी मुख्य मार्गावर गोगटे कॉलेजकडे जाताना चौकात तुळशी वृंदावन व वारकऱ्यांचे शिल्प उभे राहिले आहे. वारकऱ्यांची परंपरा जपण्याचा प्रयत्न यातून केला आहे. आषाढीवारीच्या वेळेस वारकरी येथे दर्शन घेऊन पुढे विठ्ठल मंदिराकडे कूच करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.