कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात ८ हजार ५३५ नवीन वीजजोडण्या

CD

जिल्ह्यात ८ हजार ५३५
नवीन वीजजोडण्या
महावितरण कंपनी; ग्राहकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवणार
रत्नागिरी,ता. ४ : ‘सुकर जीवनमान’ संकल्पनेनुसार वीजग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांना तत्काळ वीजजोडणी देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. गेल्या ६ महिन्यात म्हणजेच १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत रत्नागिरी परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक इतर अशा विविध वर्गवारीतील १३ हजार ७२२ वीजग्राहकांना नवीन वीजजोडणी दिली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ८ हजार ५३५ ग्राहकांचा समावेश आहे.
नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने ‘इज ऑफ लिव्हिंग’ संकल्पना आणली आहे. वीज ही आज मुलभूत गरज बनलेली असल्याने अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठ्याचा समावेश या संकल्पनेत केलेला आहे. गेल्या सहा महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात ६ हजार ७५५ घरगुती ग्राहकांना, १ हजार १२६ वाणिज्य, १०२ औद्योगिक व ५५२ इतर वर्गवारीतील ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील महावितरणच्या तीन विभागांपैकी रत्नागिरी विभागात सर्वाधिक ३ हजार ८१५ वीजजोडण्या दिल्या आहेत. सध्या महावितरण ‘कृती मानके’ नुसार जिथे वीजयंत्रणा नव्याने उभी करण्याची आवश्यकता नाही अशा शहरी भागात सात दिवसांत तर ग्रामीण भागात पंधरा दिवसांच्या आत वीजजोडणी देण्यात येते. ग्राहकांना नवीन जोडणीबाबत अधिक माहिती हवी असल्यास ते नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधू शकतात.

चौकट
घरबसल्या अर्ज करणे शक्य
ग्राहकांना घरबसल्या संकेतस्थळ व मोबाईल अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने वीजजोडणीचा अर्ज सादर करता येतो. त्यामुळे ग्राहकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन रत्नागिरी महावितरणतर्फे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage: पोळी, भाकरीलाही इंधनटंचाईचे ‘चटके’; प्रतिनग दोन ते पाच रुपयांनी दरवाढ

Ahilyanagar News: गुरुजींची बढतीसाठी खटपट! अहिल्यानगर जिल्हा परिषदेत एजंटांनी टाकले गळ, नियमातील संदिग्धतेने फावले..

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT