कोकण

वेत्ये कलेश्वर प्रशालेत शालेय वस्तूंचे वाटप

CD

75265

वेत्ये कलेश्वर प्रशालेत
शालेय वस्तूंचे वाटप


सावंतवाडी, ता. ४ ः श्री कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये येथील विद्यार्थी आणि अंगणवाडीतील मुलांना नुकतेच शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. सरपंच गुणाजी गावडे यांच्या माध्यमातून वह्या, पेन, तेल खडू आणि छत्र्यांसारख्या आवश्यक वस्तू मुलांना दिल्या.
यावेळी उपसरपंच महेश गावडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र आंबेकर, पोलिसपाटील रमेश जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती सायली गावकर, परशुराम पाटकर, पुंडलिक देऊलकर, सत्यवान गावडे, शेखर खाबल, भरत जाधव, उत्तम गावडे आणि तन्मय पाटकर हे उपस्थित होते. सरपंच गावडे यांनी, हे काम शाळा आणि मुलांच्या विकासासाठी आपली एक सेवा असल्याचे सांगितले आणि भविष्यातही असेच सहकार्य सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. मुख्याध्यापिका श्रीमती शीतल गावीत यांनी, सरपंच गावडे हे दरवर्षी अशाप्रकारे शाळेला वस्तूंचे वाटप करत असतात आणि त्यांचे शाळेसाठी अविस्मरणीय सहकार्य लाभते, असे सांगत त्यांचे आभार मानले. उपसरपंच गावडे, सदस्य आंबेकर, श्री. देऊलकर आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती सायली गावकर यांनीही सरपंचांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT